लॉर्ड शार्दुल ठाकूरनं मितालीसोबत उरकला साखरपुडा; पाहा VIDEO  Sakal
क्रीडा

लॉर्ड शार्दुल ठाकूरनं मितालीसोबत उरकला साखरपुडा; पाहा VIDEO

सकाळ डिजिटल टीम

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने मुंबईत साखरपुडा केला. शार्दुलने गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा केला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साखरपुडा समारंभ पार पडला. यामध्ये फक्त त्याचे कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते.

शार्दुल आणि मितालीला त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे. अद्याप शार्दुल किंवा मितालीने याबाबत काही माहिती दिलेली नाही. शार्दुल आणि मिताली टी२० वर्ल्ड कपनंतर लग्न करणार असल्याची माहिती समजते.

सध्या शार्दुलला बीसीसीआय़ने विश्रांती दिली आहे. भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शार्दुल खेळला आहे. आतापर्यंत त्याने ४ कसोटी आणि १५ एकदिवसीय, २४ टी२० सामने खेळले आहेत. शार्दुलने नुकतंच त्याच्या खालच्या क्रमांकावर खेळताना फलंदाजीने सर्वांना चकीत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambaghat Tunnel Project : 2,500 कोटी रुपये खर्च अन् 7 किमी लांबी...; आंबाघाटातील प्रस्तावित सहापदरी बोगदा कसा असेल? केंद्राकडे 'त्या' तीन पर्यायी अलाइनमेंट सादर

Wedding Muhurat 2027 : तुळशी विवाहानंतर सनई-चौघडे वाजणार; नव्या वर्षात सर्वाधिक मुहूर्त, पाहा जानेवारी ते जून 2027 चे संपूर्ण वेळापत्रक

Ganpatipule Tourism : सलग सुट्ट्यांमुळे कोकण 'हाऊसफुल्ल'! गणपतीपुळ्यात अवघ्या 3 दिवसांत तब्बल 60 हजार पर्यटकांची हजेरी, वॉटर स्पोर्ट्ससह आरे-वारेतील 'या' थरारक खेळाला सर्वाधिक पसंती

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT