Vinay Kumar  esakal
क्रीडा

MI ने चाहत्यांना दिली गुड न्यूज, 'हा' क्रिकेटर लवकरच होणार डॅडी

धनश्री ओतारी

क्रिकेट जगतातून टीम इंडियासाठी खुशखबर आली आहे. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर लवकरच बाप होणार आहे. ही माहिती मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनी दिली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार लवकरच वडिल होणार आहे. विनय कुमार बरेच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून लांब आहे. मात्र, तो या ना त्या कारणाने चर्चेत असतो. विनय २०२० पासून घरच्या मैदानातही दिसला नाही. विनय कुमार त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु 2013 पासून तो टीम इंडियाचा भाग नाही.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांना विनय कुमारचे वडील झाल्याची गोड बातमी दिली आहे. मुंबई इंडियन्सने विनय कुमार आणि त्याची पत्नी रिचा सिंग यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रिचा गरोदर असून ती एका मुलाला जन्म देणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याबद्दल मुंबई इंडियन्सनेही या दोघांचे अभिनंदन केले आहे.

विनय कुमारने टीम इंडियासाठी 1 कसोटी, 31 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. विनयने ऑक्टोबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विनय कुमार हे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, तो कर्नाटककडून खेळतो. विनय कुमारची पत्नी रिचा सिंग बेंगळुरू येथील इंटिग्रिटी स्पोर्ट्स कंपनीची संचालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT