India Vs New Zealand 2nd ODI esakal
क्रीडा

IND vs NZ : रायपूर ठरणार वेगवान गोलंदाजांच माहेरघर; शमीच्या माऱ्यासमोर किवी ढेर

अनिरुद्ध संकपाळ

India Vs New Zealand 2nd ODI : छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. पहिलाच सामना असल्याने खेळपट्टीची धाटणी कशी आहे याबाबत दोन्ही कर्णधारांमध्ये संभ्रमावस्था होती. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् भारताच्या वेगवान गोलंदाजांनी किवींची शकलेच उडवली. भारताने किवींनी 108 धावातच गारद केले.

भारताकडून मोहम्मद शमीने 3, हार्दिक पांड्याने 2 तर सिराज आणि शार्दुलने प्रत्येकी 1 विकेट घेत सात फलंदाज बाद केले. त्यानंतर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने 3 आणि कुलदीप यादवने 1 विकेट घेत किवींची शेपूट गुंडाळली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायपूरच्या फ्रेश विकेटवर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची पहिल्या 10 षटकातच अवस्था 5 बाद 15 धावा अशी केली.

त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मायकेल बार्सवेल यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र ही जोडी मोहम्मद शमीने फोडली. त्याने बार्सवेलला 22 धावांवर बाद केले.

त्यानंतर फिलिप्सने सँटनरसोबत भागीदारी रचत न्यूझीलंडला शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर पांड्याने सँटनरला 22 धावांवर बाद केले. पाठोपाठ फिलिप्स 36 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने लॉकी फर्ग्युसनला 1 धावेवर बाद करत किवींना नववा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने ब्लेअर टिकनेरला 2 धावांवर बाद करत न्यूझीलंडचा डाव 108 धावाच संपुष्टात आणला.

(Sports Latest News)

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT