navdeep saini instagram
क्रीडा

क्रिकेटरची सलमान स्टाईल स्टंटबाजी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सुशांत जाधव

भारतीय संघाचा नवोदित गोलंदाज नवदीप सैनी (navdeep saini) सध्या चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेटच्या मैदानातील अ‍ॅक्टिव्हीटी बंद असताना तो एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आलाय. हार्ले-डेविडसन बाईकवरुन तो स्टंटबाजी करताना दिसतोय. 28 वर्षीय गोलंदाजाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलाय. "भीती काय असते हे अनुभवायचे असेल तर माझ्या बाईकवर मागे बसा" असे कॅप्शनही त्याने या व्हिडिओला दिले आहे. (indian national cricket team fast bowler navdeep saini harley davidson bike stunt video goes viral)

इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सैनी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसला होता. क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यानंतर तो आपला काही वेळ बाईक रायडिंगसाठी खर्ची करताना दिसतोय. तो जणू सलमान खानचा फॅन असल्यासारखे फिल त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर येतो. याचे कारण त्याने बाईक स्टंट करताना शर्टलेस दिसला आहे. त्याची ही स्टाईल काहींना खटकली असून मोजक्या सामन्यानंतर हे वागण बरे नव्हे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काहीजण त्याला ट्रोलही करत आहेत. नको त्या गोष्टींवर भर देण्यापेक्षा गोलंदाजीवर लक्षकेंद्रीत कर, असा सल्लाही काहींनी त्याला दिलाय.

भारतीय संघाकडून सैनीने दोन कसोटी सामने खेळले असून यातील 3 डावात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. वनडेत त्याने 7 सामन्यातील 4 डावात 92 धावा खर्च करुन 6 विकेट मिळवल्या आहेत. भारतीय संघातून खेळताना आतापर्यंत टी-20 मध्ये त्याने सर्वाधिक 10 सामने खेळले असून 9 डावात गोलंदाजी करताना 13 विकेटस मिळवण्यात त्याला यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT