Indian Premier League to watch TATA IPL 2022 ms dhoni new look sakal
क्रीडा

Video: IPL 2022 साठी धोनीनं पापाजींना मारलं

एमएस धोनी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा आयकॉन आहे

Kiran Mahanavar

एमएस धोनी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा आयकॉन आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये त्याची वर्णी लागते. क्रिकेटच्या मैदानात भल्या भल्यांना पूरन उरलेला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार, शाहरुख खान आणि इतर सेलिब्रिटींना कडवे आव्हान देऊ शकतो. त्याची जाहिरातीतील झलकमध्ये तरी असेच दिसून येते.

धोनी आयपीएल 2022 च्या प्रोममध्ये एका नवीन अवतारात दिसला आहे. व्हिडिओमध्ये धोनी एका वृद्ध व्यक्तीच्या रुपात आपल्या कुटुंबासह आयपीएल पाहत आहे. दरम्यान, टेलिफोनची रिंग वाजते आणि धोनी एका महिलेला फोन उचलण्याचा इशारा करतो. कॉल करणाऱ्याने पापाजी आहेत का? असा प्रश्न केल्याचे पाहायला मिळते. यावेळी धोनी इशारा करून म्हणतो की पापाजी वारले म्हणून सांग.

फोनवरची महिला रडत रडत म्हणते की पापा जी तो 'आऊट' हो गये. यानंतर महिलेने विचारले की कोण स्ट्राइकवर आहे, त्यावर धोनी 'माही है' म्हणतो. हे टाटा आयपीएल आहे, असे सांगत तो आयपीएलच वेड दाखवून देत आहे. काही दिवसांपूर्वी एमएस धोनी आयपीएलच्या एका जाहिरातीत बस ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसला होता.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. संपूर्ण वेळापत्रकही जाहीर झाले आहे. लीगची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT