Parth Salunkhe
Parth Salunkhe esakal
क्रीडा

पोलंडमधील धनुर्विद्येत भारताची जबरदस्त कामगिरी

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत (World Youth Archery Competition) भारतीय संघाने (Indian team) 15 पदकांसह 8 सुवर्णपदकांची (Gold Medal) कमाई केलीय. भारतीय पुरुषांच्या संघात साताऱ्याच्या पार्थ साळुंखेचा (Parth Salunkhe) समावेश आहे. तर, ऑलिम्पिकमध्ये साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या (Archer Pravin Jadhav) कामगिरीनंतर पार्थने मिळविलेलं यश क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शिवाय, अशा खेळाडूंमुळे आपल्या जिल्ह्यासह देशाचे नाव जागतिक पातळीवर नावाजले जाणार असल्याचे स्पष्ट मत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी व्यक्त केले.

पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय संघाने 15 पदकांसह 8 सुवर्णपदकांची कमाई केलीय.

करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्थेचा खेळाडू पार्थ सुशांत साळुंखे याने युरोपमधील पोलंड देशात झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघातून पुरुष गटात आणि मिश्र गटात सुवर्णपदक मिळविले आहे. अशी कामगिरी करणारा सातारा जिल्ह्यातील तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. पार्थ साळुंखे हा शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी असून शिक्षण प्रसारक संस्थेने विकसित केलेल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात तो प्रशिक्षण घेत असतो. त्याचे प्रशिक्षक त्याचे वडील व श्रीपतराव पाटील हायस्कूलचे शिक्षक सुशांत साळुंखे हे त्याला मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि माणिक कासट बालक मंदिर या चारही शाखांमधून जवळ-जवळ शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण केंद्र सचिव तुषार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू आहे.

पार्थच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, चेअरमन वत्सला डुबल, संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, धनंजय जगताप, अॅड. भीमराव फडतरे यांनी अभिनंदन करुन अमेरिकेत होणाऱ्या सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आर्चरी स्पर्ध्येसाठीही शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT