Umpire Nitin Menon sakal
क्रीडा

Team India : 'टीम इंडियाचे मोठे खेळाडू नेहमीच...' भारतीय अंपायरच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

भारताचे अंपायर नितीन मेनन गेल्या काही वर्षांत खूप प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. तो सध्या आयसीसीच्या एलिट पॅनेलचा एक भाग आहे. 2023 च्या अॅशेस मालिकेतील पंचांच्या यादीतही त्याचा समावेश आहे. मेनन हे ICC द्वारे आयोजित 2021 आणि 2022 या दोन्ही टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंपायरिंग करताना दिसले होते. जून 2020 मध्ये ICC एलिट पॅनेलचा भाग बनल्यापासून त्याने 15 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम केले आहे.

अॅशेसच्या पदार्पणापूर्वी नितीन मेनन यांनी पीटीआयला दिले. भारतात टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान खूप दडपण असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण या दबावामुळे त्याला पुढे जाण्यात खूप मदत झाली आहे. त्याचबरोबर या दडपणामुळे त्याला परदेशात होणाऱ्या सामन्यांमध्ये अ‍ॅफिशियट करणे सोपे झाले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडे नितीन मेनन आणि विराट कोहली यांच्यातील काही निर्णयांबाबत अनेक बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावरही दोघांची जोरदार चर्चा सुरू होती. आता मेनन यांनी टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंचे नाव न घेता मोठे वक्तव्य केले आहे.

नितीन मेनन यांनी मुलाखतीत सांगितले की, जेव्हा टीम इंडिया भारतात खेळते तेव्हा खूप हाईप होतो. टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू माझ्यावर किंवा कोणावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. पण जर पंचांनी स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि दबाव हाताळला तर आपले लक्ष या दबावाकडे जात नाही. तसेच हे आम्हाला सांगते की आम्ही अशा परिस्थितीला खंबीरपणे हाताळण्यास सक्षम आहोत आणि खेळाडूंनी निर्माण केलेल्या दबावाला बळी पडत नाही. यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आहे.

अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात नितीन मेनन कार्यभार सांभाळणार आहे. त्याआधी तो असेही म्हणाला की, आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनेलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मला सुरुवातीला फारसा अनुभव नव्हता. पण गेल्या तीन वर्षांनी मला पंच म्हणून वाढण्यास मदत केली आहे.

अॅशेसबाबत तो म्हणाला की, ही एक चांगली मालिका असेल. मी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यानही इंग्लंडमध्ये होतो. बॅझबॉल काय आहे ते मी आता खरोखर पाहू शकतो. त्यामुळे काय होऊ शकते हे मला माहीत आहे. ऑस्ट्रेलियाचे वेगवान आक्रमण मजबूत आहे आणि इंग्लंडचा संघ ज्या प्रकारे खेळत आहे, ते कसोटी क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

SCROLL FOR NEXT