Deepa Karmakar esakal
क्रीडा

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

Olympian Dipa Karmakar Announces Shocking Retirement: दीपा कर्माकरने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी ती भारताची पहिली महिला जिम्नॅस्टपटू आहे आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. व्हॉल्ट प्रकारात तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

Swadesh Ghanekar

Dipa Karmakar Retirement: भारताची स्टार जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकर हिने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. दिपामुळे भारतीयांमध्ये जिम्नॅस्टीक्सचे वेड निर्माण झाले होते. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने केलेल्या अविश्वसनीय कामगिरीने जगाला थक्क केले आणि अनेक लहान मुलांना प्रेरित केले. तिच्यामुळे भारतभर जिम्नॅस्टीक्सचे वारे वाहिले.. पण, रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर दीपाला दुखापतीमुळे कारकीर्दित फार यश मिळवता आले नाही आणि आज तिने अचानक निवृत्ती जाहीर केली. ‘खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जिम्नॅस्टीक्समधून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नक्की नव्हता, परंतु हिच ती योग्य वेळ आहे. जिम्नॅस्टीक्स हा माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि मी हा प्रवास एन्जॉय केला,’ अशी पोस्ट दीपाने लिहिली.

दीपाचा पाय जन्मतः सपाट होता, परंतु तिने अशक्य कामगिरी शक्य करून दाखवली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दीपा कर्माकर ही पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बनली. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टपटू आहे, शिवाय आशियाई विजेती ठरण्याचा पहिला मानही तिने पटकावला. ती इम्फाळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्रातील वेटलिफ्टिंग प्रशिक्षक दुलाल कर्माकर यांची मुलगी आहे. दुलाल यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून दीपाला जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आगरतळा येथे दीपाला प्रशिक्षक बिस्बेश्वर नंदी यांनी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण दिले.

दीपाला कारकीर्दिच्या सुरुवातीला पायांच्या आकारामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. दीपाच्या पायाच्या आकारामुळे नंदी यांनाही तिला प्रशिक्षण देण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. जिम्नॅस्टिक ही दीपाची पहिली पसंती नव्हती, मात्र वडिलांनी तिला प्रोत्साहित केले. मेहनतीच्या जोरावर तिने २००७ मध्ये  'ज्युनियर नॅशनल' स्पर्धा जिंकली. तिने व्हॉल्ट प्रकारात २०१८ मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने कांस्यपदक जिंकले. आशियाई चॅम्पियन्सशीप स्पर्धेत तिच्या नावावर २०२४ चे सुवर्णपदक आणि २०१५ चे कांस्यपदक आहे.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत Produnova vault या सर्वात आव्हानात्मक प्रकारात लक्षवेधी कामगिरी केली. ०.१५ गुणांनी तिचे कांस्यपदक हुकले आणि तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT