Fitness Influencer Justyn Vicky ESAKAL
क्रीडा

Fitness Influencer : 210 किलो वजन मानेवर पडल्याने 33 वर्षाच्या फिटनेस ट्रेनरचा दुर्दैवी मृत्यू

अनिरुद्ध संकपाळ

Fitness Influencer Justyn Vicky : इंडोनेशियाचा अवघ्या 33 वर्षाचा फिटनेस इन्फ्लुएन्सर जस्टीन विकीचा जीममध्ये वजन उचलताना बारबेल मानेवर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तो 15 जुलैला इंडोनेशियामधील बाली येथील एका जीममध्ये वर्कआऊट करत होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त चॅनल न्यूज एशियाने दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जस्टीन विकी हा परॅडाईज बाली जीममध्ये स्क्वाट प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्याने आपल्या मानेवर मोठे वजन असलेला बार घेतला होता. मात्र त्याला हे वजन पेलवत नसल्याचे जाणवल्यानंतर तो यापासून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. (Gym Accident)

जस्टीन हे वजन पेलण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा मागच्या बाजूला तोल गेला आणि बारबेल त्याच्या मानेवर पडला. जस्टीन विकीचा स्पॉटरचा देखील तोल गेला अन् तो देखील जस्टीनसोबत मागे पडला. स्पॉटर हा वेटलिफ्टिंग करत असताना वेटलिफ्टरला सहाय्य करण्यासाठी तेथे उभा असतो. (Gym Training)

जस्टीन विकी हा 210 किलो वजन उचलून स्कॉट मारण्याचा प्रयत्न करत होता असे चायनल न्यूज एशियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार 'जस्टीनची मान मोडली आणि ह्रदय आणि फुफ्फुसला जोडणाऱ्या नस दबल्या गेल्या.'

या घटनेनंतर जस्टीनला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तातडीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही वेळात जस्टीनचा मृत्यू झाला.

फिटनेस इन्फ्लुएन्सर असलेल्या जस्टीनच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या चहात्यांनी गर्दी केली होती. जस्टीन ज्या जीममध्ये काम करत होता त्या पॅराडाईज बाली जीमने इन्स्टाग्रामवर 'जस्टीन हा फक्त फिटनेस तज्ज्ञ नव्हता. तो एक प्रेरणेच स्त्रोत आणि भक्कम पाठिंबा देणारा व्यक्ती होता.' अशी पोस्ट शेअर केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT