indoor
indoor sakal
क्रीडा

आजपासून इनडोअर हॉल गजबजणार, तीन महिन्यानंतर सरावास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा व मनपा प्रशासनाने (nagpur municipal corporation) शनिवारी परवानगी दिल्याने आता उद्यापासून शहरातील इनडोअर हॉल (indoor hall open) खुले होणार आहेत. तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बॅडमिंटनसह अन्य खेळांच्या सरावाला सुरुवात (indoor sports practice starts) होणार असल्याने खेळाडू व प्रशिक्षक खूश आहेत. (indoor sports practice starts from today in nagpur)

प्रशासनाने गेल्या रविवारी आऊटडोअर खेळांच्या सरावाला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर बॅडमिंटन, टेबल टेनिस, मुष्टियुद्ध, नेमबाजी, कुस्ती व इतर इनडोअर क्रीडा प्रकारातील खेळाडूंनीही त्यांच्याकडे सरावाची परवानगी मागितली होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी इनडोअरलाही परवानगी मिळाली. त्यामुळे आता उद्या, सोमवारपासून सर्व इनडोअर स्टेडियम व अन्य क्रीडा संकुले गजबजणार आहेत. मनपाच्या मालकीचे हॉल आजपासूनच सरावासाठी खुले होणार होते. मात्र, बऱ्याच दिवसांपासून कुलूपबंद असल्यामुळे स्वच्छता व सॅनिटायझेशन झाल्यानंतर सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर यांनी दिली.

तब्बल तीन महिन्यांनंतर सरावाची संधी मिळत असल्याने खेळाडूंसह प्रशिक्षक व पदाधिकारीही खुष आहेत. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सराव घेणारे अमित राऊत यांनी प्रशासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी केवळ सायंकाळी पाचपर्यंतच सरावाची परवानगी दिल्याबद्दल नाराजीही बोलून दाखविली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाउन लागल्यापासून मधल्या काळातील काही दिवसांचा अपवाद वगळता जवळपास आठ महिने इनडोअर हॉल बंद राहिले. याचा खेळाडूंना तर फटका बसलाच, शिवाय प्रशिक्षकांचेही आर्थिक नुकसान झाले. इनडोअर हॉलमधील उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन आहे. मात्र लॉकडाउनमुळे ही शिबिरे बंद पडल्याने बहुतांश प्रशिक्षक बेरोजगार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT