kyle jamieson twitter
क्रीडा

कायलेची कमाल! टीम इंडियाचा अर्धा संघ गारद करत रचला विक्रम

फायनलमध्ये 5 विकेटसह कायले जेमिन्सनने (Kyle Jamieson) वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपमध्ये खास रेकॉर्ड आपल्या नावे केला.

सुशांत जाधव

WTC Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा तिसरा दिवस कायले जमिन्सनने गाजवला. त्याने टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला. यात किंग कोहलीच्या विकेटचाही समावेश होता. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने केलेली 49 धावांची खेळी ही सर्वोच्च ठरली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीने 44 धावा केल्या. कायले जेमिन्सनने (Kyle Jamieson) 31 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या.

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 3 बाद 146 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. विराट कोहलीच्या रुपात जेमिन्सनने आपल्या संघाला चौथे यश मिळवून दिले. पहिल्या सत्रातच कोहली पाठोपाठ त्याने पंतलाही चालते केले. फायनलमध्ये 5 विकेटसह कायले जेमिन्सनने (Kyle Jamieson) वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपमध्ये खास रेकॉर्ड आपल्या नावे केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा पाच पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये जेमिन्सन आघाडीवर पोहचलाय. 2019 ते 2021 या कालावधीत रंगलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत जेमिन्सनने पाचव्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. या यादीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने 4 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन आणि अक्षर पटेल यांनी देखील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 4 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

जेमिन्सन याने आपल्या कारकिर्दीत 8 कसोटी सामने खेळले आहेत. सुरुवातीच्या 8 सामन्यात 5 वेळा विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनसह तो संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. फिरकीपटू अश्विनने देखील आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यात 5 वेळा असा पराक्रम केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल लढतीमध्ये सध्या न्यूझीलंडचे वर्चस्व दिसत आहे. कायले जेमिन्सच्या भेदक माऱ्यामुळे केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अवघ्या 217 धावात रोखले. दुसरीकडे फलंदाजीवेळी न्यूझीलंडच्या सलामी जोडीने 70 धावांची भागीदारी केली.

भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी 62 धावांची भागीदारी केली होती. यात न्यूझीलंडचा संघ 8 धावांनी पुढे आहे. याशिवाय न्यूझीलंडचा सलामीवीर डेवोन क्वान्वे याने अर्धशतक झळकावले. भारतीय डावात एकालाही अर्धशतक खेळी करता आलेली नाही. अजिंक्य रहाणेने केलेली 49 धावांची खेळी ही भारतीय संघाच्या पहिल्या डावातील सर्वोच्च खेळी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना पुढील खेळात आणखी आव्हान आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडच्या धावफलकावर 100 + धावा होत्या. रॉस टेलर आणि केन विल्यमसन नाबाद होते. ही जोडी फोडून उर्वरित संघाला लवकरात लवकर आटोपण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT