Ross Taylor
Ross Taylor 
क्रीडा

INDvsNZ : रॉस टेलरचे शतक;  न्यूझीलंडने नोंदविला पहिला विजय

सुनंदन लेले

हॅमिल्टन : कधीकधी अपयश संघाला निराशा झटकून सर्वोत्तम कामगिरी करायला प्रोत्साहित करते. नेमके असेच काहीतरी हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात बघायला मिळाले. भारतीय संघाने उभारलेल्या 4 बाद 347 धावांच्या मजबूत आव्हानाला 6 फलंदाज गमावून 49व्या षटकात गवसणी घालून न्यूझीलंड संघाने पहिला एकदिवसीय सामन्यात विजय मिळविला. सामनावीर रॉस टेलर (नाबाद 109 धावा) आणि कर्णधार टॉम लॅथम 138 धावांची धुँवाधार भागीदारी यजमान संघाला पहिला विजय देऊन गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
   
पहिल्या एक दिवसीय सामन्यात टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून पृथ्वी शॉ - मयांक आगरवालने एक दिवसीय पदार्पण केले. फलंदाजी चालू झाल्यावर दोघेही जम बसला वाटत असताना बाद झाले. मग विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची इन्फॉर्म जोडी मैदानात जमली. दोघांनी सुरुवातीला मोकळ्या जागेत चेंडू ढकलून पळून धावा काढल्या. मग आश्चर्याची गोष्ट घडली. विराट कोहली अर्धशतक करून बाद झाला.

टी-20 मालिकेचा मानकरी केएल राहुल फलंदाजीला आला तेव्हाच त्याच्या चालीतला विश्वास जाणवत होता. एव्हाना श्रेयस अय्यरची नजर चेंडूवर बसली होती. दोघांनी 30 षटकांचा खेळ होईपर्यंत थोडा सावध खेळ केला. नंतर श्रेयस अय्यर आणि के एल एल राहुलने बॅट तलवारीसारखी परजली आणि गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शेवटच्या 20 षटकात 191 धावा काढल्या गेल्या यावरून आक्रमणाचा आघात लक्षात येईल. श्रेयस अय्यरने एक दिवसीय सामन्यातील पहिले शतक पूर्ण केले.
राहुलने तंत्रशुद्ध फलंदाजी करत 6 षटकारांसह नाबाद 88 धावा त्यासुद्धा फक्त 64 चेंडूत केल्याने भारताला 50 षटकांच्या अखेरीला 4 बाद 347 चा तगडा धावफलक उभारता आला.

न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने बरी सुरुवात करून दिली होती. मार्टीन गुप्टील चांगला खेळत असताना नेहमीप्रमाणे बाद झाला. तरुण फलंदाज ब्लंडलला कुलदीप यादवने बाद केल्यानंतर लगेचच रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रॉस टेलरचा सोपा झेल कुलदीप यादवला पकडता आला नाही. 78 धावांची अप्रतिम खेळी करणार्‍या निकल्सला विराट कोहलीने धावबाद केले तेव्हा जाँण्टी र्‍होडस्ची आठवण झाली. 30 षटकांचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडला 175 धावा जमा करता आल्या होत्या. म्हणजेच उरलेल्या 20 षटकात 173 धावा जमा करायच्या बाकी होत्या.  जीवदान मिळालेल्या रॉस टेलरसह कप्तान टॉम लॅथमने आव्हानाचा पाठलाग चालू केला. कुलदीप यादवला 7 षटकात 65 धावा मारून तसेच शार्दूल ठाकूरच्या प्रत्येक षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर चौकार किंवा षटकार मारले गेले. विमानाने आकाशात झेप घ्यावी तशी न्यूझीलंडची धावगती सुसाट वाढली. टॉम लॅथमने कमाल आक्रमक फलंदाजी केली. रॉस टेलरने अवघ्या 73 चेंडूत शतक ठोकताना 10 चौकार 4 षटकार ठोकले.  

अफलातून फलंदाजी करणारा लॅथम 69 धावा करून बाद झाल्यावर रॉस टेलरने शतक पूर्ण करून विजय हाती घेतला. भारतीय संघाने 19 वाईड चेंडू टाकले ज्यावरून गोलंदाजांनी केलेल्या स्वैर मार्‍याचा अंदाज येऊ शकेल. सतत पराभव पचवलेल्या न्यूझीलंड संघाकरता पहिल्या सामन्यातील  विजय नवसंजीवनी देऊन जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT