Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Sakal
क्रीडा

IND vs WI : ऋतूराजला कुणाची नजर लागली?

सुशांत जाधव

India vs West Indies, 3rd T20I : वेस्ट इंडीज विरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात अखेर ऋतूराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळाली. एका बाजूला इशान किशनला सातत्याने संधी मिळत असताना ऋतूराज बाहेर का? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. पण ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी ऋतूराज गायकवाड नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला.

भारतीय संघाच्या (Team India) डावातील तिसऱ्या षटकात जेसन होल्डर गोलंदाजी करत होता. तिसऱ्या चेंडूवर ऋतूराज गायकवाडनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऋतूराजला बॉल मारायचा होता एकीकडे आणि तो गेला भलतीकडेच असा सीन पाहायला मिळाला. कायले मेर्यसने तिसऱ्या प्रयत्ना हवेत उडालेला झेल टिपला आणि ऋतूराजच्या बहुप्रतिक्षित खेळीला ब्रेक लागला. त्याने 8 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ चार धावांची भर घातली.

ऋतूराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांनी बोलून दाखवली होती. त्याने डावाला सुरुवात केल्यानंतर त्याचा आनंदही सोशल मीडियावर दिसून आला. पण तो स्वस्तात माघारी फिरल्यानंत काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्याचे पाहायला मिळाले. ऋतूराज कधी खेळणार? असा प्रश्न सारखा सारखा विचारला गेला.

त्यामुळेच त्याला नजर लागली, अशा आशयाची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने ऋतूराजकडून बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. एका सामन्यात त्याने मोठी कामगिरी करावे, असे नाही. त्याला सातत्याने संधी मिळायला हवी, अशी भावनाही त्याने व्यक्त केलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT