Virat Kohli Twitter
क्रीडा

रनमशिन विराटची एक इन्स्टा पोस्ट किती कोटींची असते माहितेय?

बॉलिवूडमधील किंग खानला इन्स्टा पोस्टला जेवढी रक्कम मिळते त्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक रक्कम विराट कोहलीला एका पोस्टमधून कमावतो.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील लोकप्रिय क्रिकेटर पैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे. याचा विराटला केवळ एकापेक्षा एक सरस असे ब्रँड मिळवण्यासाठी तर फायदा झालाच. याशिवाय इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून त्याच्या कमाईतही भर पडते आहे. बॉलिवूडमधील किंग खानला इन्स्टा पोस्टला जेवढी रक्कम मिळते त्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक रक्कम विराट कोहलीला एका पोस्टमधून कमावतो. (Instagram Rich List You Know How Much Virat Kohli charges Every Instagram Post)

इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तिमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश झालाय. आघाडीच्या 20 जणांच्या यादीत असणारा तो एकमेव भारतीय आहे. तो 19 व्या क्रमांकावर आहे. या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) 27 व्या क्रमांकावर आहे. प्रियांका चोप्रा प्रत्येक पोस्टमागे जवळपास 3 कोटी रुपये कमावते.

जगभरात एका पोस्टसाठी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम हा फुटबॉल जगतातील स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावे आहे. रोनाल्डो एका पोस्टसाठी 12 कोटींच्या घरात कमाई करतो. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी या यादीत सातव्या क्रमांकावर असून तो एका पोस्टच्या माध्यमातून जवळपास 8 कोटी 70 लाखांची कमाई करतो. ब्राझीलचा फुटबॉलपटू या यादीत 16 व्या क्रमांकावर असून तो एका पोस्टसाठी जवळपास 6 कोटी रुपयांची कमाई करतो.

HopperHQ's 'इन्स्टाग्राम रिचलिस्ट (Instagram Richlist)' नुसार, विराट कोहली सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत 19 व्या स्थानावर आहे. कोहलीला प्रत्येक पोस्टमागे जवळपास 5 कोटी रुपये मिळतात. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 132 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो स्वत: 215 जणांना फॉलो करतो. इन्स्टाग्रामवर 100 मिलीयन फॉलोअर्सचा आकडा पार करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय आहे.

इन्स्टाच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारे आघाडीचे पाच सेलिब्रिटी

1. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( जवळपास 11,98,54,890 रुपये)

2. WWE स्टार ड्वेन जॉसन (जवळपास 11,37,95,894 )

3. एरियाना ग्रांडे (जवळपास 11,28,24,557 रुपये)

4. कायले जेनर (करीब 11,16,29,065 रुपये)

5. सेलेना गोमेज (जवळपास 10,96,76,849 रुपये)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT