India Mens Hockey Team John Locher
क्रीडा

FIH Awards 2021: हरमनप्रीत-गुरजीतसह पीआर श्रीजेशचे नामांकन

हरमनप्रीतने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या ड्रॅग-फ्लिकने 8 सामन्यात 6 गोल डागले होते.

सुशांत जाधव

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (International Hockey Federation ) हरमनप्रीत सिंग आणि गुरजीत कौर यांना 'प्लेयर ऑफ द इयर' अवॉर्डसाठी नामांकित केले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघातील या दोघांशिवाय भारतीय संघाचा गोली पीआर श्रीजेशला 'गोलकीपर ऑफ द इयर' पुरस्काराच्या शर्यतीत आहे.

हरमनप्रीतने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या ड्रॅग-फ्लिकने 8 सामन्यात 6 गोल डागले होते. भारतीय संघाच्या कांस्य पदक विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने 41 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. पुरुष संघाशिवाय महिला संघानेही ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. महिला हॉकी संघातील शर्मिला देवीला सर्वोत्तम महिला खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. खेळाडूंशिवाय भारतीय पुरुष संघाचे मुख्य कोच ग्राहम रीड आणि भारतीय महिला हॉकी संघाचे कोच मारिन यांना सर्वोत्तम कोच म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

खेळाडू, कोच, मीडिया आणि चाहते 23 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान संबंधित खेळाडूंसाठी मतदान करु शकतात, अशी माहिती देखील एफआयएचने दिली आहे. या मतदान प्रक्रियेत राष्ट्रीय संघातील मतदानाला 50 टक्के तर मीडिया, चाहते आणि खेळाडूंच्या 25-25 टक्के अशी विभागणी करुन विजेता निवडण्यात येईल. ऑक्टोबरमध्ये विजेत्यांची नावे घोषीत करण्यात येतील. कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पुरस्काराची घोषणा झाली नव्हती. त्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT