ILT20 esakal
क्रीडा

ILT20 : मुकेश अंबानींच्या संघानं अदानींच्या संघाला दिली मात; टिम डेव्हिडनं 273 च्या स्ट्राईक रेटनं धुतलं

अनिरुद्ध संकपाळ

International League T20 : इंटरनॅशनल लीग टी 20 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात मुकेश अंबानींच्या एमआय अमिराती संघाने गौतम अदानींच्या गल्फ जायंट्स संघाचा 18 धावांनी पराभव केला. एमआय अमिरातीचा कर्णधार निकोसल पूरन आणि टिम डेव्हिडीने धडाकेबाज फलंदाजी केली. संघाने 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. मात्र गल्फ जायंट्स संघाला 20 षटकात 9 बाद 161 धावाच करता आल्या.

गल्फ जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एमआयची सुरूवात खराब झाली होती. दुसऱ्याच षटकात विल स्मीड 1 धाव करून बाद झाला. संघाने 12 षटकापर्यंत 66 धावात 3 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार निकोलस पूरनने अंबाती रायुडूसोबत 69 धावांची भागीदारी रचली. रायुडू 25 धावा करून बाद झाला. तर पूरनने 28 चेंडूत 50 धावा चोपल्या.

त्यानंतर आलेल्या टीम डेव्हिडने 15 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार ठोकत धडाकेबाज 41 धावा केल्या. त्याने या धावा 273.33 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या. सामनावीराचा पुरस्कार देखील त्यालाच देण्यात आला. गल्फ जायंट्सकडून ख्रिस जॉर्डनने 2 विकेट्स घेतल्या. मात्र त्याने 48 धावा देखील दिल्या.

जेमी ओवरटननेही केली धुलाई

गल्फ जायंट्सकडून फलंदाजी करताना जेम्स विंसने 43 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 52 धावा केल्या. जेमी ओवरटनने 18 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकार मारत 41 धावा ठोकल्या. त्याने 227.78 च्या स्ट्राईक रेटने धेवा केला. मात्र गल्फच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. उसमान ख्वाजा 20 चेंडूत 22 धावा करून बाद झाला तर हेटमायर 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता रद्द, क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलंय?

Pune News : पथ विभागाच्या १०२ पैकी केवळ ८ निविदांना गती; सुमार कारभारामुळे पुणेकर खड्ड्यात

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : फडणवीस सरकारकडून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर...

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

SCROLL FOR NEXT