ioc sets deadline of early 2025 to keep boxing in the olympics swiss supreme court Sakal
क्रीडा

Boxing : ऑलिंपिकच्या रिंगणातून बॉक्सिंग बाहेर? २०२५पर्यंत नवी संघटना स्थापन करण्याचे आव्हान

बॉक्सिंग या खेळाला बुधवारी जबरदस्त धक्का बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि बॉक्सिंग सामन्यांचा संदर्भ व निकाल यामधील साशंकता हे कारण पुढे करीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची (आयबीए) मान्यता काढून घेतली.

सकाळ वृत्तसेवा

लुसाने (स्वित्झर्लंड) : बॉक्सिंग या खेळाला बुधवारी जबरदस्त धक्का बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि बॉक्सिंग सामन्यांचा संदर्भ व निकाल यामधील साशंकता हे कारण पुढे करीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची (आयबीए) मान्यता काढून घेतली.

तसेच गेल्या वर्षी आयबीएचे रशियन अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी आयओसीतील कर्मचाऱ्यांबद्दल हिंसक आणि धमकावणारी भाषा वापरल्याचा आरोपही केला होता. क्रीडा लवादाने मंगळवारी आयओसीच्या निर्णयाचे समर्थन केले, त्यामुळे आता बॉक्सिंग या खेळाचे ऑलिंपिंकमधील अस्तित्व धोक्यात आले आहे. २०२५पर्यंत नवीन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यात अपयश आल्यास २०२८मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिकमधून बॉक्सिंग हा खेळ बाहेर फेकला जाणार आहे.

बॉक्सिंग हा खेळ जागतिकस्तरावर खेळला जातो. या खेळाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बॉक्सिंग हा खेळ ऑलिंपिकमध्ये असावा, असे आयओसीला वाटते. मात्र, २०२८ लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग या खेळाच्या स्पर्धांसाठी आयओसी पुढाकार घेऊ शकत नाही. आयओसीकडून याकरिता आवाहन करण्यात आले आहे की, विविध राष्ट्रीय संघटना किंवा ऑलिंपिक समिती यांनी पुढाकार घेऊन नवी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करावी. जेणेकरून बॉक्सिंग या खेळाचा ऑलिंपिकमधील प्रवेश सुकर होईल.

जागतिक बॉक्सिंगला प्राधान्य

आयओसीकडून नवीन बॉक्सिंग संघटना स्थापना करण्याचे सूचवण्यात आले आहे. सध्या जागतिक बॉक्सिंग संघटना कार्यरत आहे. जागतिक बॉक्सिंगने आयबीएसोबत गेल्या वर्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नेदरलँड्‌स येथील बोरीस वॅन डर यांची अध्यक्षपदी निवड झाली. जागतिक बॉक्सिंग स्वत:च्या अधिपत्याखाली स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत २७ देशांनी या संघटनेची संलग्नता मिळवली. त्यामुळे जागतिक बॉक्सिंगला आयओसीकडून प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता आहे.

स्वीस सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार

आयबीएकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येऊ शकते. आयओसी व क्रीडा लवादाच्या निर्णयाविरोधात ते स्वीस सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. तसेच पक्षपाती निर्णय असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT