IPL 2021 Auction,  Glenn Maxwell
IPL 2021 Auction, Glenn Maxwell  
क्रीडा

​IPL 2021 Player Auction 2021: ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींची लॉटरी

सकाळ ऑनलाईन टीम

ख्रिस मॉरिससाठी 75 लाख एवढीच पायाभूत किंमत होती. या किमतीवरून त्याने 15.25 कोटींची भरारी घेतली. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स आणि बंगळूर यांच्यात अगोदर स्पर्धा झाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स शर्यतीत उतरले आणि त्यांनी आयपीएलच्या लिलावात इतिहास घडवला. कसोटी स्पेशालिस्ट पुजाराची निवड होत असताना हनुमा विहारी याला मात्र कोणीही बोली लावली नाही.

ख्रिस मॉरिसची कामगिरी
लिलावात सर्वाधिक किंमत मिळालेल्या मॉरिसनला आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. अमिरातीत झालेल्या आयपीएलमघ्ये तो बंगळूर संघाचा सदस्य होता. 9 सामन्यांत मिळून त्याला 11 विकेटच मिळवता आल्या होत्या आणि त्याने 39 धावाच केल्या. 2 नोव्हेंबरच्या आयपीएलच्या सामन्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

जेमिसन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक

6.8 फूट उंची असलेल्या न्यूझीलंडच्या कायले जेमिसनला अनपेक्षेतपणे 15 कोटींचा भाव मिळाला. बंगळूर संघाने त्याला आपल्या संघात घेतले. जेमिसन अद्याप भारतात एकदाही खेळलेला नाही, तसेच आतापर्यंत तो न्यूझीलंडकडून चार ट्‌वेन्टी-20 आणि दोन एकदिवसीय सामने खेळलेला आहे. 

ग्लेन मॅक्‍सवेललाही भाव

जेय रिचर्डसनसाठी स्पर्धा

ऑस्ट्रेलियाचा तरुण वेगवान गोलंदाज जेय रिचर्डसनसाठी मोठी स्पर्धा झाली. पंजाब किंग्स संघाने त्याला 14 कोटींमध्ये आपल्या संघात घेतले. 2019 मध्ये झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत रिचर्डसनने कोहलीला सलग तीन सामन्यात बाद केले होते.

कोल्टर नाईल पुन्हा मुंबईकडे

मुंबई इंडियन्सने नॅथन कोल्टर नाईल आणि पॅन्टीन्सन या वेगवान गोलंदाजांना रिलिज केले होते. आजच्या लिलावात कोल्टर नाईलला त्यांनी बोली लावत पाच कोटी रुपयांत पुन्हा आपल्या संघात घेतले. दुसरा वेगवान गोलंदाजासाठी मुंबईने न्यूझीलंडच्या एडम मिल्नला पसंती दिली. त्याच्यासाठी 3.20 कोटी मोजले.

आयपीएल लिलाव दृष्टीपथात
 

  • कृष्णाप्पा गौतम भारतीयांमध्ये सर्वाधिक 9.25 कोटींना चेन्नईकडून खरेदी
  • स्टीव स्मिथसाठी 2.2 कोटीच, दिल्ली संघात
  • मोईन अलीसाठी चेन्नईकडून 7 कोटी
  • कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्‍वर पुजारा चेन्नई संघात 
  • लेगस्पिनर पियूष चावला मुंबई संघातून खेळणार
  • भारतात एकही सामना न खेळणारा जेमिसन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महाग खेळाडू
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT