Australia players  Twitter
क्रीडा

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठा दिलासा!

ऑस्ट्रेलियन बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळण्याची परवानगी दिलीये.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कपच्या अगोदर युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएल Indian Premier League (IPL) स्पर्धेत खेळण्याचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मार्ग मोकळा झालाय. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात रंगलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उर्वरित सामने हे युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपस्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ऑस्ट्रेलियन बोर्ड (Cricket Australia) संघातील खेळाडूंना आयपीएल खेळण्यास परवानगी देणार नसल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र ऑस्ट्रेलियन बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळण्याची परवानगी दिलीये.

ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरंगी मालिका नियोजित होती. त्यामुळे आयपीएलऐवजी खेळाडू राष्ट्रीय ड्युटीला प्राधान्य देतील, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र ही मालिका पुढे ढकलताच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंसाठी पुन्हा आयपीएलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला.

डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, जय रिचर्डसन, केन रिचर्डसन, आणि डॅनियल सॅम्स हे सात ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळतात. ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या निर्णयानंतर हे खेळाडू पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील. पॅट कमिन्स याने यापूर्वी आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची पत्नी प्रेग्नंट असून आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी त्याने कुटुंबियांसोबत राहण्याला प्राधान्य दिले आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा मे महिन्यातच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये पुन्हा आयपीएलचा रणसंग्राम रंगणार आहे. उर्वरित 31 सामने 27 दिवसांमध्ये नियोजित आहेत. आयपीएल स्पर्धा संपताच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाला सुरुवात होणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीने उर्वरित सामन्यांना सुरुवात होईल. दुबईत 13 शारजात 10 सामने तर उर्वरित 8 सामने हे अबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Killing Case : ‘तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ लाथा बुक्यांनी मारताना आडवायला गेलेल्यालाच भोसकलं; २५ वर्षीय शीतलचा मृत्यू, सांगलीत मोठा तणाव

Latest Marathi News Updates : ओबीसी आंदोलकांनी औंढा नागनाथ मध्ये मार्ग रोखला

मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक; ‘मना’चे श्लोकचा भन्नाट टीझर प्रदर्शित

Mumbai Local Fight: दे दणा दण... कॉलर पकडली, एकमेकांना ठोसे हाणले; मुंबईच्या लोकलमध्ये फ्री स्टाईल राडा Video Viral

Agriculture News : कांदा बाजारात नाफेडचा हस्तक्षेप; फडणवीस यांनी लक्ष घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी

SCROLL FOR NEXT