Chris Morris and Jaydev Unadkat IPL Twitter
क्रीडा

IPL 2021, DCvsRR - महागड्या खेळाडूनं दिला फिनिशिंग टच

राजस्थान रॉयल्स संघाने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2021 Rajasthan vs Delhi, 7th Match : डेविड मिलरची (David Miller) किलर खेळी आणि आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू क्रिस मॉरिसचा (Chris Morris) फिनिशिंग षटकाराच्या जोरावर राजस्थानने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals Innings) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून राजस्थानचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयदेव उनादकटने (Jaydev Unadkat) कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दिल्लीच्या संघाला सुरुवातीलाच धक्के दिले. सलामीवर पृथ्वी शॉ 2(5) आणि शिखर धवन 9(11) धावा करुन बाद झाले. खिंडार भरुन काढण्याची क्षमता असलेला अजिंक्य रहाणे 8 चेंडूत 8 धावा करुन परतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गोत्यात आला. या तिघांनाही उनादकटने बाद केले.

स्पोर्टसच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुस्ताफिजूरने स्टॉयनिसला खातेही उघडू दिल नाही. संघाल संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी कर्णधार रिषभ पंतवर (Rishabh Pant) येऊन पडली. त्याने ललित यादवच्या साथीने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. धावफलकावर 88 धावा असताना पंत रन आउट झाला. रियान परागने त्याला बाद केले. पंतने 32 चेंडूत 51 धावांची उपयुक्त खेळी केली. क्रिस मॉरिसने ललित यादवला बाद करुन दिल्लीच्या संघाला सहावा धक्का दिला. 16 चेंडूत 21 धावा करणाऱ्या टॉम कुरेनच्या रुपात मुस्ताफिजूरने दुसरे यश मिळवले. अश्विन सात धावावंर रनआउट झाला. क्रिस वोक्सच्या 11 चेंडूतील नाबाद 15 धावा आणि रबाडाने 4 चेंडूत केलेल्या 9 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली होती.

विराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटींचे पॅकेज

पंजाब विरुद्धच्या सामन्यात 200+ धावा करणारा राजस्थानच्या संघाची सुरुवातही दिल्ली कॅपिटल्सप्रमाणे खराब झाली. क्रिस वोक्सने मनन ओहराला अवघ्या 9 धावांवर चालते केले. जोस बटलरलाही त्याने दोन धावांवर पंतकरवी झेलबाद केले. यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावणारा राजस्थानचा कर्णधार 4 धावांची भर घालून माघारी फिरला. रबाडाने धवनकरवी त्याला झेलबाद केले. आघाडीचे गडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर डेविड मिलरने 43 चेंडूत 62 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. रियान पराग अवघ्या 2 धावांची भर घालून परतल्यानंतर मिलरने राहुल तेवतियाच्या साथीने 48 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या राहुल तेवतियाला रबाडाने 19 धावांवर बाज केले. रियानची विकेट घेणाऱ्या आवेश खानने सेट झालेल्या मिलरला बाद करत राजस्थानचे टेन्शन वाढवले. पण आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी किंमत मिळालेल्या क्रिस मॉरिसने हिंमत दाखवली. त्याने 18 चेंडूत केलेल्या नाबाद 36 धावा आणि उनादकटने त्याला दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. 3 गडी आणि दोन चेंडू राखून राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा दणका दिला.

क्रिस मॉरिस-उनाडकट यांच्यात आठव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी, राजस्थान रॉयल्सचा स्पर्धेतील पहिला विजय

104-7 : 43 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी करुन डेविड मिलर झाला बाद, आवेश खानने घेतली विकेट

मिलरने 40 चेंडूत साजरे केले आयपीएलमधील दहावे अर्धशतक

90-6 : रबाडानं फोडली मिलर-राहुलची जोडी; राहुल 17 चेंडूत 19 धावा करुन माघारी या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली

42-5 : रियान पराग अवघ्या दोन धावा करुन फिरला माघारी, आवेश खानला मिळाले यश

36 - 4 : शिवम दुबेच्या रुपात राजस्थानला चौथा धक्का

17-3 : रबाडाने राजस्थानच्या कर्णधाराला अवघ्या 4 धावांवर धाडले तंबूत

3-2 : जोस बटलरचा पंतने घेतला सुरेख झेल, तो 2 धावा करुन फिरला माघारी

13-1 मनन वोहरा पुन्हा फेल, क्रिस वोक्सने 9 धावांवर केलं चालते

136-8 : रविचंद्रन अश्विन 4 धावांवर रन आउट

128-7 : अखेरच्या षटकात 16 चेंडूत उपयुक्त 21 धावांची खेळी करणाऱ्या टॉम कुरेनला मुस्तफीझूरने धाडले तंबूत

100-6 : क्रिस मॉरिसने घेतली ललित यादवची विकेट, त्याने 24 चेंडूत 20 धावांची खेळी केली

88-5 : रियागने पंतला रनआउट केले, पंतने 32 चेंडूत 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली

37-4 : मुस्तफिजूरने स्टॉयनिसला खातेही उघडू दिले नाही

36-3 : अजिंक्य रहाणे 8 धावा करुन माघारी

16-2 : उनादकटने धवनच्या रुपात दिल्लीला दिला दुसरा धक्का, त्याने 9 धावा केल्या

5-1 : पृथ्वी शॉ अवघ्या दोन धावा करुन माघारी, उनादकटला मिळाली विकेट

टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT