Quinton de Kock  IPL Twitter
क्रीडा

IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी

क्विंटन डिकॉकच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सहज सामना जिंकला

सकाळ डिजिटल टीम

Mumbai vs Rajasthan, 24th Match : क्विंटन डिकॉकची नाबाद अर्धशतकी खेळी 70 (50) आणि कृणाल पांड्याने केलेली फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सनी पराभूत केले. क्रिस मॉरिसने रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. त्याने 17 चेंडूत 14 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने 16 धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. त्यालाही मॉरिसनेच बाद केले. कृणाल पांड्याच्या रुपात मिस्तफिझुरला एक विकेट मिळाली. त्याने 26 चेंडूत 39 धावा केल्या. कृणाल पांड्याने आपल्या छोट्याखानी इनिंगमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. केरॉन पोलार्ड 8 चेंडूत 16 तर क्विंटन डिकॉक 50 चेंडूत 70 धावांवर नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सने दिल्लीतील मैदानात दमदार सुरुवात केली आहे.

सलामीवीर जोस बटलर 41 (32) आणि यशस्वी जयस्वाल 32(20)धावा करत पहिल्या विकेटसाठी केलेली अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन 42 (27) आणि शिवम दुबेने 31 चेंडूत केल्या 35 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या आहेत. डेविड मिलर 4 चेंडूत 7 आणि रियान पराग 7 चेंडूत 8 धावा करुन नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून राहुल चाहरने 2 तर बुमराह आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

ज्याची लायकी नाही त्याला घेतला की... बायकोलाच रोल दिला बोलणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं चोख उत्तर; म्हणाले-

Yavatmal News : जिल्हाधिकार्‍यांचा पेट्रोल पंपांवर धडक दौरा; साठा, सीसीटीव्ही आणि वितरण व्यवस्थेची तपासणी

Latest Marathi News Live Update: सेट परीक्षेच्या तारखा जाहीर; २६ जुलैला होणार परीक्षा

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

SCROLL FOR NEXT