Suresh Raina Sakal
क्रीडा

IPL 2022: ...तर कवडी मोलाचा रैना होईल गुजरात टायटन्सचा 'अनमोल रतन'

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या महिन्याच्या 26 तारखेपासून आयपीएलचे बिगूल वाजणार आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरणाऱ्या गुजरात टाइटन्सला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने आयपीएल 2022 च्या हंगामातून माघार घेतली आहे. बराच काळ बायो बबलमध्ये घालवल्याने थकवा जाणवत असल्याचे कारण सांगून त्याने स्पर्धेतू माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.

इंग्लिश मॅनच्या या निर्णयानंतर मिस्टर आयपीएल स्पशलिस्ट सुरेश रैना चर्चेत आला आहे. जेसन रॉयची जागा भरून काढण्यासाठी गुजरातचा नवा संघ त्याला आपल्या ताफ्यात घेईल, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघाला स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी गुजरात लायन्स संघ दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता.

यावेळी सुरेश रैनानेच या संघाचे नेतृत्व केले होते. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये रैनाला धक्का बसला. आधी चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिलीज केले. त्यानंतर मेगा लिलावातही त्याला भाव मिळाला नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत असलेल्या रैनाची 2 कोटी एवढी मूळ किंमत होती. पण त्याला संघात घेण्यासाठी कुणीही उत्सुकता दाखवली नाही.

जेसन रॉयने संघातून माघार घेतल्यानंतर सोशल मीडियावर रैनाच्या चाहत्यांनी रैनासाठी बॅटिंग सुरु केलीये. रैनाला संघात घ्या, अशा प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. गुजरात टाइटन्सने आतापर्यंत त्याच्या रिप्लेसमेंटचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मैदानात उतरणाऱअया गुजरात टायटन्सचा संघ रैनाला घेण्याची हिंम्मत दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT