ipl 2023 auction mi vs csk  sakal
क्रीडा

IPL 2023 Auction: दोन परदेशी खेळाडूसाठी MI अन् CSK मध्ये जुंपणार ?

इंडियन प्रीमियर लीग 2023 मिनी लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमियर लीग 2023ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी 23 डिसेंबरला मिनी लिलाव कोची येथे आयोजित करण्यात येत आहे. या लिलावात कमी खेळाडूंवर बोली लावावी लागली तरी फ्रँचायझींमधील काही खेळाडूंसाठी खडतर लिलाव होऊ शकतो. त्यापैकी IPL चे दोन सर्वात मोठे संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांचाही समावेश आहे.

या दोन्ही संघांकडे 20 कोटींहून अधिक रुपये शिल्लक आहेत. लिलावापूर्वी सीएसकेने ड्वेन ब्राव्होसह 7 खेळाडूंना सोडले तर मुंबईने 9 खेळाडूंना सोडले. दोन्ही फ्रँचायझींना सारख्याच खेळाडूंची गरज आहे त्यापैकी CSK ला 2 परदेशी खेळाडू आणि मुंबईला 3 परदेशी खेळाडूंची गरज आहे. दोन परदेशी खेळाडू आहोत ज्यांच्यावर दोन्ही मोठ्या फ्रँचायझी आपली पूर्ण ताकद पणाला लावू इच्छितात.

दोन्ही फ्रँचायझींना त्यांच्या संघात उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे. ज्यासाठी इंग्लंडचा युवा सॅम करन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन सर्वोत्तम आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये बॅट आणि बॉलने संघासाठी योगदान देण्याची ताकद आहे. त्यापैकी कॅमेरून ग्रीन अतिशय आक्रमक ठरत आहे. त्याच वेळी सॅम करणने 2022 मध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे. त्‍याला टी-20 विश्‍वचषकाच्‍या फायनलमध्‍येही सामनावीराचा बहुमान मिळाला होता. एवढेच नाही तर त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले.

टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ज्यामध्ये कॅमेरून ग्रीनची सर्वोत्तम कामगिरी भारतीय खेळपट्ट्यांवर पाहायला मिळाली. तीन टी-20 मालिकेतील 2 सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 39.33 च्या सरासरीने 118 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही त्याने चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत तो आयपीएलमधील कोणत्याही संघासाठी प्रभावी ठरू शकतो. दोन्ही खेळाडू लिलावात सहभागी झाले असून त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT