IPL 2023 auction 
क्रीडा

IPL 2023 Auction : लिलावाचे तारीख ठरली! 'या' दिवशी होणार, जाणून घ्या सर्व

आयपीएलच्या पुढील 16 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो.

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction : आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मिनी लिलाव होणार आहे. ताज्या माहितीनुसार आयपीएल 2023 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. यावर्षी सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळतील. हा फॉरमॅट सुरुवातीपासून सुरू आहे, पण कोरोनामुळे 2019 पासून या फॉरमॅटमध्ये स्पर्धा खेळवता आली नाही.

आयपीएलच्या पुढील 16 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. 2019 पासून पुढील दोन हंगाम भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते. 2021 चा हंगाम भारतात सुरू झाला होता, परंतु कोरोना संसर्गाची प्रकरणे मध्यभागी आल्यानंतर हंगाम यूएईला हलवावा लागला. 2022 चा हंगाम संपूर्णपणे भारतात आयोजित करण्यात आला होता, परंतु हंगामातील लीग टप्प्यातील सामने फक्त तीन शहरांमध्ये खेळले गेले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर प्लेऑफचे आयोजन करण्यात आले होते.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संघांना 90 कोटी रुपये रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या लिलावासाठी ते 95 कोटी रुपये केले जाऊ शकते. गेल्या वर्षी एक मेगा लिलाव झाला होता, परंतु हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी सौरव गांगुलीने राज्य संघटनेला पाठवलेल्या पत्रात सांगितले होते की, यावेळी लीग होम आणि अवे स्वरूपात आयोजित केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT