IPL 2023 Auction
IPL 2023 Auction sakal
क्रीडा

IPL 2023 Auction: विराट कोहलीचा खास श्रीलंकन फिरकीपटूचा कहर! 11 चेंडूत ठोकल्या 50 धावा

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction : आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव आज कोची येथे होणार आहे. याच्या एक दिवस आधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या गोलंदाजाने बॅटने कहर केला. या गोलंदाजाने लंका प्रीमियर लीगच्या एका सामन्यात आपल्या संघासाठी कर्णधारपदाची खेळी खेळली होती.

वानिंदू हसरंगा लंका प्रीमियर लीगमध्ये कॅंडी फाल्कन्स संघाचे कर्णधार आहे. त्याने गुरुवारी कोलंबो स्टार्सविरुद्ध फलंदाजी करताणा 226 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 34 चेंडूत नाबाद 77 धावा ठोकल्या. हसरंगाने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. म्हणजेच त्याने 11 चेंडूत 50 धावा ठोकल्या. आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी हसरंगाला आरसीबीने कायम ठेवले आहे. गेल्या मोसमातील मेगा लिलावात या श्रीलंकेच्या लेगस्पिनरला आरसीबीने 10 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतले होते.

लंका प्रीमियरच्या या सामन्यात कोलंबा स्टार्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टार्सच्या गोलंदाजांनी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा हा निर्णय पहिल्या काही षटकांत योग्य असल्याचे दाखवून दिले. पहिल्याच षटकात कसून राजिताने कॅंडी फाल्कन्सचे दोन्ही सलामीवीर पाथुम निसांका आणि आंद्रे फ्लेचर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. निसांका 2 धावा आणि फ्लेचर खाते न उघडता बाद झाला. यानंतर कामिंदू मेंडिसही लवकर बाद झाला. यानंतर कर्णधार वानिंदू हसरंगाने अशेन बंदारासह फाल्कन्सचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 55 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली.

वानिंदू हसरंगाने 15 व्या षटकात चौकारांसह 50 धावा पूर्ण केल्या. यासाठी त्याने 22 चेंडू खेळले. दोन षटकांनंतर बंदारा 40 धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर फॅबियन ऍलनही पॅव्हेलियनमध्ये परतला. पण कर्णधार वानिंदू हसरंगा शेवटपर्यंत खंबीर राहिला आणि आक्रमक फलंदाजी करत राहिला. त्याच्या बळावर फाल्कन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. हसरंगाने या मोसमात 118 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 10 विकेट्सही घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT