bcci covid-19-positive-players-7-days-isolation-during-tournament-ipl-2023  
क्रीडा

IPL 2023: बीसीसीआयने IPL बाबत घेतला मोठा निर्णय! कोविड झाला तर खेळाडू होणार बाहेर?

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने कठोर नियम केले होते परंतु आताही....

Kiran Mahanavar

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलचा थरार ३१ मार्चपासून रंगणार आहे. त्याआधी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने मोठा बदल जाहीर केला आहे.

फ्रँचायझींसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत, जी सर्व संघांच्या खेळाडूंना पाळावी लागतील. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने स्पर्धेच्या सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. कोरोना विषाणूला लक्षात घेऊन बीसीसीआयने हे मोठे पाऊल उचलले आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, या आठवड्यात आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना कोविड मार्गदर्शक तत्त्वे सांगितली जातील. ते पूर्वीसारखे कठोर नाही, परंतु जर एखादा खेळाडू किंवा संघातील सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर त्याला किमान 1 आठवड्याचा आयसोलेशन कालावधी घ्यावा लागेल. दरम्यान, तो कोणत्याही संघाच्या कोणत्याही सामन्यात किंवा सराव सत्रात भाग घेणार नाही.

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला आठवडाभर आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर पाचव्या दिवशी त्या खेळाडूची आरटी पीसीआर चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आल्यास 24 तासांच्या आत पुन्हा चाचणी केली जाईल. दोन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच खेळाडू संघातील सदस्यांमध्ये सामील होऊ शकेल.

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने कठोर नियम केले होते, परंतु यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने संघांना त्यांच्या घरच्या क्रिकेट मैदानावरही खेळता येणार आहे. मात्र बीसीसीआयने वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही बरीच शिथिलता दिली आहे. कोरोनाबाबत बीसीसीआयचे असे मत आहे की, आम्हाला अजूनही याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT