ipl-2023-deepak-chahar-broke-silence-on-MS Dhoni-retirement-said-last-year  
क्रीडा

IPL 2023 : 'धोनीचे शेवटचे वर्ष...' माहीच्या निवृत्तीवर दीपक चहरचा मोठा खुलासा

Kiran Mahanavar

MS Dhoni IPL 2023 : इंडियन सुपर लीगचा 16वा हंगामाला सुरू होण्यासाठी अवघे 11 दिवस राहिल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग मध्ये एमएस धोनीच्या भवितव्याबद्दल गेल्या काही काळापासून अफवा पसरल्या आहेत. धोनीने पुष्टी केली की तो या वर्षीच्या स्पर्धेत चेन्नईतील घरच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच खेळेल.

चेन्नई सुपर किंग्जमधील त्याच्या भविष्याबाबत कोणतीही ठोस बातमी नाही. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला नुकतेच या विषयावर विचारण्यात आले आणि त्याने मोठा खुलासा केला आहे.

सीएसकेचा स्टार खेळाडू दीपक चहरने धोनीच्या निवृत्तीबाबत मोठा अपडेट दिला आहे. चहरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, कोणीही असे म्हटले नाही की धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. त्यांनी स्वतः असे सांगितले नाही किंवा आम्हाला असे काही माहित नाही. त्याने संघासाठी जास्तीत जास्त खेळावे अशी आमची इच्छा आहे.

दीपक चहर पुढे म्हणाला, धोनीला माहित आहे की त्याला कधी निवृत्ती घ्यायची आहे. जेव्हा त्याने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा संपूर्ण जगाने त्याला पाहिले आहे. निवृत्तीचा निर्णय फक्त त्याच्यावर आहे आणि कोणालाच माहीत नाही. मला आशा आहे की तो आता आयपीएलमध्ये अधिक खेळेल. त्याच्या कर्णधारपदाखाली खेळणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. त्याच्यासोबत खेळणे हे स्वप्न होते.

चेन्नई सुपर किंग्स हा इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. जरी 2022 मध्ये धोनीने रवींद्र जडेजाला आपला उत्तराधिकारी बनवले, परंतु संघाच्या सततच्या पराभवानंतर जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा एकदा धोनी संघाचा कर्णधार झाला. त्याचवेळी आयपीएल 2023 मध्ये केवळ धोनीच संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT