ipl 2023-deepak chahar-ready-to-make-comeback-csk-ms-dhoni cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IPL 2023: दुखापतीमुळे हा दिग्गज खेळाडू गतवर्षी भारतीय संघातून बाहेर! ...अन् आता आयपीएलमध्ये परतणार

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 : दुखापतीमुळे गतवर्षीची आयपीएल आणि यंदा भारतीय संघातून खेळण्यास मुकावे लागलेला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू दीपक चहर तंदुरुस्त झाला असून त्याला या वर्षीच्या आयपीएलचे वेध लागले आहेत.

मी दुखापतीमधून सावरण्यासाठी गेले दोन- तीन महिने प्रचंड मेहनत घेत आहे. पहिल्यांदा मला घोट्याला दुखापत झाली, तर त्यानंतर मांडीचे स्नायू दुखावले. या दुखापती याअतिशय त्रास देणाऱ्या होत्या. जेव्हा जलदगती गोलंदाजाला गंभीर किंवा कित्येक महिने बाहेर बसावे लागेल अशी दुखापत तेव्हा पुनरागमन करणे जास्त अवघड असते, असे चहरने सांगितले.

मी केवळ फलंदाज असतो तर, दुखापतींशिवाय मी सलग कित्येक सामने खेळू शकलो असतो. परंतु, विशेषतः जलदगती गोलंदाजाला सतत दुखापतींचा सामना करावा लागतो. आम्हाला नेहमीच दुखापतींचे भय असते. त्यात मला मागच्या वर्षी दोन कारकिर्द धोक्यात आणणाऱ्या दुखापती झाल्या. दुखापतींमधून जाणे हे कोणालाच आवडत नसते, परंतु खेळाडूला या सर्वाचा कधी ना कधी सामना करावाच लागतो, असे चहर म्हणाला.

भारतीय संघातील अनेक जलदगती गोलंदाजांना दुखापतीमधून जावे लागत आहे. मी जेव्हा पूर्ण लयीमध्ये असतो तेव्हा माझ्याकडून चांगली गोलंदाजी किंवा फलंदाजी होत असते. मनापासून क्रिकेट खेळणे हेच माझे नेहमीचे ध्येय असून ; त्याकरता प्रयत्न करत राहणे माझ्या हातात आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यास मी उत्सुक असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT