IPL 2023 New Rules 
क्रीडा

IPL 2023 New Rules: आयपीएलच्या नियमात बदल! आता नाणेफेकीनंतर होणार खेळाडूंची घोषणा

Kiran Mahanavar

IPL 2023 New Rules : आयपीएलच्या आगामी मोसमात नियमामध्ये बदल होताना दिसणार आहेत. यानुसार आता दोन्ही कर्णधार नाणेफेक झाल्यानंतर अंतिम अकरा खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. नाणेफेकीच्या कौलाचा फटका बसू नये, दोन्ही संघांना समसमान संधी असायला हवी यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. अर्थात, या नव्या नियमाबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. क्रीडाविषयक माध्यमावर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आयपीएलमधील नियमाबाबत सूत्रांकडून सांगण्यात आले, की सध्या नाणेफेकी आधीच दोन्ही संघांतील कर्णधार एकमेकांकडे अंतिम अकरा खेळाडूंच्या नावांची यादी सोपवतात, पण यापुढे आता नाणेफेकीनंतर अंतिम अकरा खेळाडूंच्या नावांची यादी सोपवणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या सोयीनुसार संघ निर्वी येणार आहेत. तसेच इम्पॅक्ट प्लेयर याचा उपयोगही दोन्ही संघांना योग्य वेळी करता येण्याची दाट शक्यता आहे.

आफ्रिकेतील लीगमध्ये अवलंब

दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टी- २० लीग या वर्षी खेळवण्यात आली. यामध्ये नाणेफेकीनंतर अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ या वेळी म्हणाले, आम्ही येथील टी-२० लीगमध्ये नाणेफेकीच्या महत्त्वाला कमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT