ipl 2023 kolkata knight riders star bowler lockie ferguson injured after captain shreyas iyer ahead of ipl
ipl 2023 kolkata knight riders star bowler lockie ferguson injured after captain shreyas iyer ahead of ipl  
क्रीडा

IPL 2023 : कर्णधार अय्यरनंतर KKR ला आणखी एक मोठा धक्का! आता 'हा' स्टार गोलंदाज जखमी

सकाळ डिजिटल टीम

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सला दोन मोठे धक्के बसले आहेत. अलीकडेच केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. त्याच वेळी, आयपीएल पूर्वी, स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसन देखील श्रीलंकेविरुद्धच्या ODI मालिकेपूर्वी (NZ vs SL) हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यात आडकला आहे.

IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 1 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र याआधी संघाला सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. अलीकडेच, स्पीड किंग लॉकी फर्ग्युसनला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. याआधी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरही जखमी झाला होता.

त्याचवेळी, आयपीएलच्या 16 व्या सीझनपूर्वी केकेआरच्या अडचणी कमी होत नाहीत. संघाला आधीच त्यांचा कर्णधार निवडायचा होता आणि आता त्यांच्या संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी देखील जखमी झाला आहे.

आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावू शकतो, त्यामुळे संघाला मोठा फटका बसू शकतो. फर्ग्युसनच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर त्याचा आयपीएलमधील सहभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कर्णधार श्रेयससोबत फर्ग्युसनही आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्याला मुकू शकतो.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

केकेआर पूर्ण संघ

श्रेयस अय्यर, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगदीसन, वैभव अरोडा, सुयश शर्मा , डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, शाकिब अल हसन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT