MS Dhoni Chennai Super Kings 
क्रीडा

MS Dhoni Injured: रोहितनंतर आता धोनीही IPL चे सामने मुकणार? समोर आली धक्कादायक माहिती

सकाळ ऑनलाईन टीम

Chennai Super Kings MS Dhoni Injured IPL 2023 : आयपीएलचा 16वा हंगामा सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळणार नाही. या बातमीतून चाहते कुठेतरी सावरत होते. त्यातच चेन्नई सुपर किंगच्या चाहत्यांना मोठा धक्का बसु शकतो.

आयपीएलसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली असून खेळाडू आपापल्या घरच्या मैदानावर जोरदार सराव करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही सराव करत आहे. सराव सत्रादरम्यान धोनी डाव्या पायाने लंगडा होताना दिसला. धोनीला पळताना अडचणी येत होती. धोनीच्या दुखापतीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी, CSK साठी ही चिंतेची बाब आहे कारण चेन्नई सुपर किंग्ज 31 मार्चला त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सशी होणार आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सोमवारी एमएस धोनीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सीएसकेने त्यांच्या चाहत्यांना संघाचा सराव पाहण्यासाठी आमंत्रित केले होते, त्यानंतर अनेकजण जिममध्ये धोनीची ट्रेनिंग पाहण्यासाठी गेले. या सराव सत्रात धोनीने काही मोठे फटकेही खेळले जे पाहून चाहते आंनदी झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या पायात काही समस्या निर्माण झाली होती. IPL 2023 च्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोनी सराव सत्रादरम्यान लंगडताना दिसला होता. धोनीच्या दुखापतीबाबत फ्रँचायझीकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT