रोहित शर्मा sakal
क्रीडा

IPL 2023 : ‘इम्पॅक्ट खेळाडू’ असला तरी अष्टपैलूचे महत्त्व कमी नाही ; रोहित शर्मा

‘मुंबई’चा कर्णधार रोहित शर्माचे मत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयपीएलमध्ये समावेश होत असलेल्या ‘इंम्पॅक्ट खेळाडू’ या नव्या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होणार नाही, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. इम्पॅक्ट खेळाडूचा आयपीएलमध्ये किती प्रभाव पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही; परंतु अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व संघामध्ये असते तेवढेच राहाणार आहे. सामन्याच्या कोणत्याही स्थितीत तो कलाटणी देऊ शकतो. फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून त्याचा कधीही वापर करता येत असतो, असे रोहित शर्मा म्हणतो.

अष्टपैलू खेळाडूचा वापर आपण कसाही करू शकतो. पाचवा-सहावा गोलंदाज असो किंवा अतिरिक्त फलंदाज असो, संघाला गरज असते तेव्हा अष्टपैलू खेळाडू उपयोगी ठरत असतो, तसेच त्याच्यामुळे संघाचा समतोलही साधता येत असतो, असे रोहित शर्माने सांगितले.

इम्पॅक्ट खेळाडूचा पर्याय यंदापासून सुरू होत असला तरी सामन्यासाठी निवडण्यात आलेले ११ खेळाडू सर्वोत्तम असणे आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होणे महत्त्वाचे असते. इम्पॅक्ट खेळाडूचा नियम यंदा प्रथमच होत आहे. त्याचा वापर कसा करायचा हे अजून कोणालाही समजलेले नाही. सुदैवाने आमचा पहिला सामना २ एप्रिल रोजी आहे, तोपर्यंत चार सामने झालेले असतील आणि त्यातून आम्हालाही तयार होता येईल, असे रोहित म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना उडवलं, थरार CCTVमध्ये कैद

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT