IPL 2023 Mumbai Indians Will Organize England Tour For Indian Young Players  esakal
क्रीडा

IPL 2023 | जोरदार पुनरागमनाचा मुंबई इंडियन्सने आखला प्लॅन

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2023) मध्ये पाच वेळा आयपीएल टायटल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था फारच वाईट झाली होती. प्ले ऑफच्या शर्यतीतून सर्वात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच बाहेर पडली होती. मात्र आता मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या हंगामाची तयारी आतापासूनच करण्यास सुरूवात केली आहे. फ्रेंचायजी जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीयेत अशा भारतीय खेळाडूंना जुलैमध्ये तीन महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) घेऊन जाणार आहे. या दौऱ्यात मुंबई इंडियन्सचे खेळाडू अद्यावत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतील. तसेच ते काऊंटी क्रिकेटमधील दर्जेदार क्लब सोबत 10 टी 20 सामने देखील खेळतील.

आयपीएलमधील एका सूत्राने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'एनटी तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, मनदीप सिंह, ऋतिक शौकीन यासारख्या खेळाडूंना यामुळे आव्हानात्मक परिस्थिती अव्वल दर्जाच्या टी 20 क्लब सोबत खेळण्याचा अनुभव मिळेल.'

सूत्रांनी पुढे सांगितले की, 'ब्रिटनमध्ये दाखल झालेला अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटर डेवाल्ड ब्रेविस देखील या संघासोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या युवा खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सहयोगी स्टाफ देखील इंग्लंडमध्ये जाणार आहे.'

'भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगाम संपला आहे. कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे भारतीय संघासोबत आहेत. दुसरे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील त्यांच्या त्यांच्या देशाकडून खेळण्यात व्यग्र आहेत. ज्या खेळाडूंवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणजे आमचे युवा खेळाडू. कारण त्यांना पुढचा देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तीन साडेतीन महिने मॅच प्रॅक्टिस करता येणार नाही.'

इंग्लंड दौऱ्यावर जाणारे खेळाडू

तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, मयंक मार्कंडेय, राहुल बुद्धी, रमनदीप सिंह, अनमोलप्रीत सिंह, बेसल थम्पी, मुरगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT