IPL 2023 Sanju Samson esakal
क्रीडा

IPL 2023 Sanju Samson : राजस्थान रॉयल्सच्या पार्टीतील डान्सचा VIDEO व्हायरल; संजू तर कडं तोडून...

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Sanju Samson : आयपीएलचा थरार अवघ्या काही तासांवर आला आहे. शुक्रवारी 31 मार्चला गुजरात जायंट्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने IPL 2023 ची सुरूवात होणार आहे. आयपीएल मधील सर्व संघ स्पर्धेपूर्वी कसून सराव करत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने हंगामाची सुरूवात होण्यापूर्वी एक जोरदार पार्टी केली. या पार्टीत संघातील खेळाडूंनी भन्नाट डान्स केला. यात संघाचा कर्णधार संजू सॅमसन देखील मागे नव्हता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सच्या पोस्टची कायम चर्चा असते. आयपीएल म्हटलं की मनोरंजन हे आलचं मग त्यात राजस्थान रॉयल्सचे सोशल अकाऊंट्स आणि खेळाडू देखील सर्वात आघाडीवर असतात. राजस्थान रॉयल्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आरआरचे खेळाडू जोरदार पार्टी करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रियान पराग, केसी करिअप्पा, कुणाल सिंह राठोड हे युवा खेळाडू डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत महिला डान्सर कडे करून खेळाडूंच्या सभोवती नृत्य करत होत्या. याचवेळी संघाचा कर्णधार संजू सॅमसनला एका सहकाऱ्याने यामध्ये जबरदस्तीने ढकलत डान्स करायला लावला.

संजूच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ आपला पहिला सामना हैदराबादविरूद्ध 2 एप्रिलला खेळणार आहे. हा सामना हैदराबाद येथे होणार आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ :

संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, एडम झाम्पा, केएम आसिफ, मुरगमन अश्विन, आकाश वशिष्ट, अब्दुल पीए, जो रूट.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

Hingoli News: ई-पीकच्या नोंदींची होणार पडताळणी;पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT