IPL 2023 Schedule esakal
क्रीडा

IPL 2023 Schedule : पहिल्याच सामन्यात गुरू शिष्य भिडणार; आयपीएल 16 व्या हंगामाची तारीख झाली जाहीर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Schedule : आयपीएल 2023 अर्थात 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून आयपीएलचा हा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार असून हंगामातील लीगचा शेवटचा सामना 21 मे ला होणार आहे. पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलचे 10 संघ लीग स्टेजमध्ये 70 सामने खेळणार आहे. आयपीएलचा हा कुंभमेळा जवळपास दीड महिना चालणार आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरूवात धमाकेदार होणार आहे. 31 मार्च 2023 ला पहिलाच सामना हा गतविजेचा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. या सामन्यानेच आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे.

बीसीसीआयने अजून आयपीएलच्या प्ले ऑफची तारीख जाहीर केलेली नाही. लीग स्टेजमध्ये 54 मॅच डे मध्ये 70 सामने होणार आहेत. यात 18 डबलहेडर होणार असून प्रत्येक संघ 7 सामने घरच्या तर 7 सामने दुसऱ्या मैदानावर खेळणार आहेत. आयपीएलच्या 16 व्या हंगामात 10 संघांची विभागणी ही दोन ग्रुपमध्ये केली आहे.

IPL 2023 ग्रुप A

  • मुंबई इंडियन्स

  • राजस्थान रॉयल्स

  • कोलकाता नाईट रायडर्स

  • दिल्ली कॅपिटल्स

  • लखनौ सुपर जायंट

IPL 2023 ग्रुप B

  • चेन्नई सुपर किंग्ज

  • पंजाब किंग्ज

  • सनराईजर्स हैदराबाद

  • रॉयल चॅलेंजर बेंगलोर

  • गुजरात टायटन्स

(Sports Latest News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT