Rishabh Pant Sourav Ganguly IPL 2023
Rishabh Pant Sourav Ganguly IPL 2023 esakal
क्रीडा

Rishabh Pant IPL 2023 : सौरव गांगुली पंतच्या संपर्कात; पुनरागमनाबद्दल म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Sourav Ganguly IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा डायरेक्टर सौरव गांगुलीसमोर यंदाच्या आयपीएल हंगामात चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. दिल्लीचा पूर्णवेळ कर्णधार ऋषभ पंतचा अपघात झाल्यामुळे तो यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. मात्र पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा विकेटकिपर कोण असणार याबाबत मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत सौरव गांगुली म्हणाला की, मी ऋषभ पंतसोबत अनेकवेळी बोललो आहे. दुखापती आणि शस्त्रक्रियेनंतर सहाजिकच तो कठिण परिस्थितीतून जात आहे. मी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो.' गांगुली पुढे म्हणाला की, एक वर्ष किंवा काही वर्षात तो भारताकडून परत खेळायला लागले.

गांगुलीला तो पंत दुखापतीतून लवकर सावरण्यासाठी आयपीएल हंगामात त्याला संघासोबत पाहणे पसंत करणार का असे विचारले असता मला माहिती नाही आम्ही यावर विचार करू असे उतत्र दिले. दिल्ली संघ व्यवस्थापनाला गांगुलीला पंतच्या पर्यायाबाबत अजूनही निर्णय घेता आलेला नाही. अनुभवी शेल्डन जॅक्सनसोबत जायचं की युवा अभिषेक पोरेलवर विश्वास दाखवायचा हे अजून निश्चित झालेले नाही.

पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करू शकतो. तर अक्षर पटेलला उपकर्णधार असेल. गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्यात दिल्ली कॅपिटल्सचे तीन दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, चेतन साकरिया, मनिष पांडे यांच्यासह काही युवा खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

गांगुली याबाबत म्हणाला की, 'आयपीएलला अजून एक महिना अवकाश आहे. शिबीर आताच सुरू झाले आहे. खेळाडू एवढं क्रिकेट खेळत आहेत की त्यांना एकत्र आणणं खूप अवघड आहे. चाप ते पाच खेळाडू इराणी ट्रॉफी खेळत आहेत. सर्फराजच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालेलं नाही. तो आयपीएलपर्यंत ठिक होईल अशी आशा आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT