IPL Auction 2022 Updates esakal
क्रीडा

IPL Auction 2022 : नवीन संघांना खेळाडू रिटेन करण्यासाठी मिळणार २ आठवडे

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएल नियामक समितीचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Auction 2022) हा १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले. याचबरोबर त्यांनी आयपीएल (IPL) मधील नवीन दोन संघांना म्हणजे अहमदाबाद आणि लखनौ संघांना खेळाडू रिटेन करण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याबबतचे अधिकृत पत्र दोन्ही संघांना दोन दिवसात पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. (IPL Auction 2022 Date)

सीव्हीसी कॅपिटल्स ग्रुपला मिळाला क्लिअरन्स

आयपीएल नियमाक समितीच्या (IPL Governing Council) बैठकीत अहमदाबाद संघाचे मालकी हक्क सीव्हीसी ग्रुपकडे देण्यास मान्यताही देण्यात आली. याबाबतचे पत्र बीसीसीआय (BCCI) प्रसिद्ध करेल असे ब्रजेश पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आयपीएल नियामक समितीने सीव्हीसी ग्रुपच्या (CVC Group) अहमदाबाद संघासाठीच्या मालकी हक्काला मंजूरी दिली आहे. याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात येईल.' सीव्हीसी ग्रुपचे एका बेटिंग कंपनीशी आर्थिक व्यवहार आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) याबाबतची तपासणी सुरु केली होती.

ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप (IPL Title Sponsor) व्हिवो कडून काढून घेत टाटाकडे देण्यात आल्याचेही सांगितले. त्यांनी आयपीएलच्या नियामक समितीने व्हिवोची करारातून बाहेर पडण्याची विनंती मान्य केल्याचे सांगितले. टाटा आता आयपीएलच्या १५ व्या आणि १६ व्या हंगामाचे टायटल स्पॉन्सर असणार आहेत. याचबरोबर बीसीसीआय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १५ वा हंगाम एकाच राज्यात म्हणजे महाराष्ट्रात खेळवण्याबाबत विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT