IPL Auction 2023 sakal
क्रीडा

IPL Auction 2023: टीम इंडियातून कारकीर्द संपलेल्या 'या' खेळाडूला रिकी पाँटिंगने घेतले संघात...

या दिग्गजच्या बुडत्या कारकिर्दीला दिल्ली कॅपिटल्सने दिली साथ...

Kiran Mahanavar

IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी एका खेळाडूच्या नावाची जोरदार चर्चा झाली. 15 वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 6 फूट उंचीच्या या गोलंदाजाची कारकीर्द संपत आली आहे. त्याच्या बुडत्या कारकिर्दीला दिल्ली कॅपिटल्सने साथ दिली.

भारतीय क्रिकेटचा अनुभवी 34 वर्षीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माची टी-20 कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर येऊ शकते. त्याच्या होम टीम दिल्लीने या खेळाडूला मिनी लिलावात अवघ्या 50 लाखांच्या मूळ किंमतीत खरेदी केले. याआधी तो 2019 ते 2021 पर्यंत दिल्लीसोबत राहिला आहे. त्याच्या संघासोबतही एक नवीन इनिंग असेल. हैदराबाद सनरायझर्स संघात सामील झाल्यानंतर त्याची कारकीर्द उतरणीला लागली होती. गेल्या मोसमात त्याला कोणीही विकत घेतले नव्हते.

इशांत शर्माने 2008 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मेलबर्नमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. इशांतसोबत डेव्हिड हसी आणि प्रवीण कुमार यांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

34 वर्षीय इशांत शर्माने आतापर्यंत केवळ 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडे फक्त 8 विकेट आहेत. त्याने कसोटीत 105 सामन्यात 311 बळी घेतले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या अनुभवी वेगवान गोलंदाजाने 80 सामन्यांमध्ये 115 बळी घेतले आहेत. एकूण T20 कारकिर्दीत त्याने 145 सामन्यात 117 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT