IPL 2023 Auction Nicholas Pooran 
क्रीडा

IPL 2023 Auction : सुपर फ्लॉप असूनही निकोलस पूरनला 16 कोटी का मिळाले?

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction Nicholas Pooran : आयपीएल 2023 च्या मेगा लिलावात टी-20 विश्वचषक 2022 आणि आयपीएलच्या शेवटच्या हंगामातील सुपर फ्लॉप खेळाडूवर जोरदार बोली लागली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने पूरनला मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटी लखनौने पूरनला खरेदी करण्यात यश मिळविले. तेही 16 कोटी रुपयांना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा यष्टीरक्षक ठरला आहे. गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादने त्याला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

आयपीएल 2022 आणि विश्वचषकातील खराब कामगिरीही त्याची किंमत कमी करू शकली नाही. त्याला गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे मिळाला आहे. पुरणवर पैशांचा पाऊस पडला, पण सुपर फ्लॉप असूनही त्याला 16 कोटी रुपये कसे मिळाले, हे कोणालाच कळत नाही?

यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची लांब षटकार मारण्याची ताकद. अलीकडेच अबू धाबी टी-10 लीगमध्येही त्याने त्याची झलक दाखवली होती. पूरन हा T10 लीगमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होता. त्याने 10 सामन्यात 25 षटकार मारले होते. फक्त लांब षटकार मारल्यामुळे त्यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होती.

IPL 2022 मध्ये हैदराबादमध्ये झालेल्या 14 सामन्यांत पुरणला केवळ 306 धावा करता आल्या होत्या. फ्रँचायझीही त्याच्या कामगिरीने खूप निराश होती. गेल्या आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी नाबाद 64 होती. त्याच वेळी पूरनने 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले. आणि त्याचा संघ पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला होता. वेस्ट इंडिजने 3 पैकी 2 सामने गमावले होते. यानंतर पुरणने कर्णधारपदही सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे मामा

SCROLL FOR NEXT