IPL Media Rights
IPL Media Rights  
क्रीडा

IPL Media Rights: पहिल्या दिवशीच 100 कोटींची बोली; मागील वेळेपेक्षा दुप्पट

Kiran Mahanavar

LIVE IPL Media Rights Auction 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी मुंबईतील बड्या कंपन्यांमध्ये बोली अजून सुरू आहे. बोली आज संध्याकाळी 6 वाजता आणि उद्यापर्यंत चालणार आहे. पण आतापर्यंत ही बोली चाळीस हजार कोटींपर्यंत पोहोचू शकते, पण सध्या समोर आलेल्या बातम्यांनी बीसीसीआयची धांदल उडाली आहे. प्रत्येक सामन्याच्या हक्कांसाठी (टीव्ही+डिजिटल) बोली 100 कोटींच्या पुढे गेल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा स्थितीत ही बोली सोमवारी संपणार हे बोली कुठे थांबेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

बीसीसीसीने प्रत्येक सामन्याच्या हक्काची मूळ किंमत 49 कोटी रुपये निश्चित केली होती. ताजी बातमी अशी आहे की डिजिटल आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया हक्कांसाठी बोलीची किंमत 40,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. याचाच अर्थ या टप्प्यावरच मागच्या वेळी मिळालेल्या रकमेच्या दुपटीहून अधिक बोली लागली आहे. BCCI ला 2018-22 पर्यंत मीडिया हक्कांमधून 16,347 कोटी रुपये मिळाले होते, तर यावेळी BCCI ने चार गटांचा समावेश करून बोलीची मूळ किंमत 32,890 कोटी रुपये निश्चित केली आहे.

पॅकेज खालीलप्रमाणे...

  • अ- भारतीय उपखंडातील टीव्हीवरील प्रक्षेपण हक्कांच्या प्रत्येक लढतीसाठी ४९ कोटी

  • ब- भारतीय उपखंडातील डिजिटल प्रक्षेपण हक्कांच्या प्रत्येक लढतीसाठी ३३ कोटी

  • क- शनिवार-रविवारच्या लढती व प्ले ऑफच्या लढतींसाठी ११ कोटी

  • ड- परदेशातील टीव्ही व डिजिटल प्रक्षेपण हक्कांच्या प्रत्येक लढतीसाठी तीन कोटी

‘बीसीसीआय’कडून ‘आयपीएल’ मधील लढती वाढवण्याचा विचार सुरू आहे. नव्या योजनेनुसार पहिल्या दोन वर्षी ७४ लढती खेळवण्यात येतील. त्यानंतरच्या ‘आयपीएल’ मोसमांत ८४ ते ९४ लढती खेळवण्याचा विचार करण्यात येत आहे. स्टार इंडिया, झी एंटरटेन्मेट इंटरप्रायझेस, रिलायन्स वायाकॉम, सोनी ग्रुप, ड्रीम इलेव्हन, ॲपेल इन्क, सुपरस्पोर्ट (दक्षिण आफ्रिका) या कंपन्या शर्यतीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT