AB de Villiers | Hardik Pandya Sakal
IPL

Hardik Pandya: 'हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो, तो धोनीसारखा...' एबी डिविलियर्सचं MI कॅप्टनबाबत खळबळजनक भाष्य

AB de Villiers: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अहंकार जाणवत असल्याचे एबी डिविलियर्सने म्हटले आहे.

Pranali Kodre

AB de Villiers on Hardik Pandya Captaincy: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसला. या हंगामापूर्वी रोहित शर्माच्या हटवून त्याच्याकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले, या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती.

त्यातच आता मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. प्लेऑफ शर्यतीतून बाहेर होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्की यंदा मुंबई इंडियन्सवर ओढावली आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरही टीका केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सनेही त्याच्यावर टीका केली आहे.

डिविलियर्सने त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हटले आहे की हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार दिसून येतो. त्याने म्हटले आहे की तो एमएस धोनीप्रमाणे शांत आणि छाती बाहेर ठेवून नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते प्रत्येकवेळी काम करत नाही.

डिविलियर्स म्हणाला, 'हार्दिक पांड्याची नेतृत्व शैली खूप धाडसी आहे. त्यात अहंकार भरलेला वाटतो. मला असं वाटत नाही की त्याने मैदानावरील चालणे नेहमीच प्रामाणिक असते, पण त्याने ठरवले आहे की माझी हीच नेतृत्वाची पद्धत आहे.'

'काहीशी एमएस धोनीसारखी शैली आहे. शांत आणि सामुहिक, नेहमी छाती बाहेर ठेवणारी. पण जेव्हा तुम्ही अनेक अनुभवी खेळाडूंसह खेळत असता, जे खेळाडू खूप वर्षांपासून खेळत असतात, त्यांना हे नेहमीच पटत नाही.'

'ही शैली गुजरात टायटन्समध्ये फायदेशीर ठरली, कारण तिथे युवा संघ होता. कधीकधी अनुभव नसलेल्या खेळाडूंना अशा प्रकारच्या नेतृत्वाला फॉलो करायला आवडते.'

डिविलियर्सने याबाबत स्वत:चा अनुभवही सांगितला आहे. त्याने सांगितले की 'मला आठवते ग्रॅमी स्मिथ संघात होता. तेव्हा एक युवा म्हणून मला त्याचे अनुसरण करायचे असायचे. पण आता संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह असे खेळाडू आहेत. त्यांना फक्त इतके हवे असते की तू शांत रहा आणि सामना कसा जिंकायचा, याबाबत थोडे सल्ले दे. त्यांना उगीच धाडसीपणा नको असतो.'

डिविलियर्स पुढे म्हणाला, 'मला हार्दिक पटत नाहीये. मला त्याला खेळताना पाहायला आवडते. त्याने छाती पुढे करू खेळणे मला आवडते, कारण मीही तसाच होतो. मला असं वाटतं की फलंदाज म्हणून कधीकधी तुम्हाला असं खोटं दाखवावं लागतं.'

हार्दिक 2015 ते 2021 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला होता. त्यानंतर त्याला मुंबईने करारमुक्त केले. त्यामुळे तो 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघात गेला. या संघाचे त्याने नेतृत्वही करताना 2022 आणि 2023 या सलग दोन हंगामात गुजरातला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले.

त्याचबरोबर 2022 मध्ये गुजरातने त्याच्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपदही जिंकले. मात्र आयपीएल 2024 आधी मुंबईने हार्दिकला ट्रेडिंगमधून पुन्हा संघात घेतले. तसेच हार्दिककडे नेतृत्वही सोपवले. मात्र सध्या हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला 12 सामन्यांपैकी 4 सामनेच जिंकता आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT