Ajinkya Rahane Catch | Chennai Super Kings | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, CSK vs GT: अजिंक्य रहाणेने सूर मारत पकडला मिलरचा 'किलर' झेल, Video होतोय व्हायरल

Ajinkya Rahane Catch: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेने सूर मारत अफगातून झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane Catch: चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी (26 मार्च) गुजरात टायन्सविरुद्ध आयपीएल 2024 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात 63 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात क्षेत्ररक्षणाचेही महत्त्वाचे योगदान राहिले. त्यातही अजिंक्य रहाणेने घेतलेल्या झेलने सर्वांची वाहवा मिळवली.

या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 55 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, त्यानंतर डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी गुजरातला 90 धावांचा टप्पा पार करून दिला होता. पण याचवेळी 12 व्या षटकात तुषार देशपांडे गोलंदाजीला आला. त्याने पाचवा चेंडू लेग स्टंपला टाकला, त्यावर मिलरने जोरदार फ्लिक शॉट मारला.

त्याचवेळी रहाणेने डीप मिड - विकेटला पळत येत सूर मारून दोन हातांनी अफलातून झेल घेतला. त्यामुळे मिलर 16 चेंडूत 21 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र गुजरातला पुनरागमन करणे कठीण झाले. गुजरातला 20 षटकात 8 बाद 143 धावा करता आल्या.

गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तसेच वृद्धिमान साहानेही २१ धावा केल्या. परंतु, बाकी कोणाला फार काही करता आले नाही. चेन्नईकडून गोलंदाजी करताना दीपक चाहर, मुस्तफिजूर रेहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या डावात रहाणेव्यतिरिक्त एमएस धोनीने यष्टीरक्षण करताना विजय शंकरचा अफलातून झेल घेतला. तसेच रचिन रविंद्रनेही या सामन्यात तीन झेल घेतले. त्याने अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया आणि राशिद खान यांचे झेल घेतले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सकडून शिवम दुबेने 23 चेंडूत सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. याशिवाय रचिन रविंद्रने 20 चेंडूत 46 आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने 36 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईला 20 षटकात 6 बाद 206 धावा करता आल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT