Hardik Pandya Ambati Rayudu Meet After Mumbai Indians 3rd Defeat ipl 2024 Marathi News
Hardik Pandya Ambati Rayudu Meet After Mumbai Indians 3rd Defeat ipl 2024 Marathi News  esakal
IPL

Hardik Pandya IPL 2024 : रायुडूनं केलं हार्दिकचं सांत्वन...? मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याची आयपीएलच्या 17 व्या हंगामात चांगली सुरूवात झालेली नाही. मुंबईचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पांड्याला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यात नाराज चाहते प्रत्येक सामन्यात हूटिंग करून हार्दिक पांड्याचे जगणे मुश्किल करून टाकत आहेत.

सोमावरी राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबईला आपल्या होम ग्राऊंडवर पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचा माजी खेळाडू अंबाती रायुडू मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमध्ये हार्दिक पांड्याला धीर देताना दिसला.

हार्दिकवर चाहत्यांचा प्रचंड रोष

हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा 17वा सीझन आतापर्यंतच्या वाईट आठवणींनी भरलेला आहे. यावेळी त्याला चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांकडून सतत हार्दिकला टोमणे मारले जात आहेत.

मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवरही असेच काहीसे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स संघ सोमवारी या मोसमात प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर खेळला, परंतु संघाचा नवा कर्णधार हार्दिकला येथेही चाहत्यांचा रोष सहन करावा लागला.

रायुडूने दिला धीर

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या दु:खी झाला, त्यानंतर अंबाती रायडूने त्याला धीर दिला. मुंबईच्या डगाऊटमध्ये हे दोघे आजी-माजी खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसले. यादरम्यान रायडूने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. मुंबई इंडियन्सने या दोघांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत 'आपण का पडतो? कारण त्यातून आपणाला उभं कसं रहायचं हे शिकायला मिळतं!' असं कॅप्शन दिलं.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT