Amit Mishra | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: मिश्राजी तुस्सी ग्रेट हो! 40 मध्ये दाखवली 20 वर्षांची चपळता, आधी झेल अन् 4 चेंडूत फिरवला सामना

"हा 40 वर्षांचा अनुभवी किंवा 40 वर्षांचा तरुण",अमित मिश्राच्या फ्लाइंग कॅचने सर्व थक्क...

Kiran Mahanavar

IPL 2023 Amit Mishra : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधील स्पर्धेच्या सुरुवातीपासून काही दिग्गजांनी सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी दोन चेंडू दोन षटकार ठोकणाऱ्या 41 वर्षीय एमएस धोनीची अद्याप संपलेली नाही, तर शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये अमित मिश्राने आश्चर्यचकित केले.

आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होता. या सामन्यात हैदराबादची फलंदाजी फ्लॉप ठरली. संपूर्ण संघाला 20 षटकात 8 विकेट गमावता 121 धावा करता आल्या. या मोसमातील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. लखनौ सुपर जायंट्सने या सामन्यासाठी 40 वर्षीय अमित मिश्राला प्लेइंग-इलेव्हनमध्ये स्थान दिले होते आणि लखनौसाठी लेगस्पिनरचे पदार्पण संस्मरणीय होते. अमित मिश्राने 2 विकेट तर घेतल्याच, पण एक अप्रतिम झेलही घेतला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अमित मिश्रा आयपीएल 2022 च्या लिलावात न विकला गेला होता. पण यावेळी लखनौ सुपर जायंट्सने त्याला 50 लाख रुपयांना खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्याला प्लेइंग-इलेव्हनमध्ये स्थान दिले. 40 वर्षांचा अमित मिश्रा देखील या विश्वासावर खरा राहिला आणि त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. आयपीएल 2021 नंतरचा हा त्याचा पहिला सामना होता.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने 4 षटके टाकली आणि 23 धावांत 2 बळी घेतले. या दोन्ही विकेट त्याने एकाच षटकात 4 चेंडूत घेतल्या. यामुळे हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अमितने वॉशिंग्टन सुंदरला प्रथम बाद केले. यानंतर त्याने आदिल रशीदला आपला शिकार बनवले. या दोन विकेट्सपूर्वी अमित मिश्राने राहुल त्रिपाठीचा अप्रतिम झेल घेतला.

यश दयालच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने स्लिपच्या भागावर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागला नाही आणि 30 यार्डच्या आत उभ्या असलेल्या 40 वर्षीय अमित मिश्राने पुढे उडी मारून झेल घेतला.

अमित मिश्राला 7 वर्षांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो 2016 मध्ये भारतासाठी शेवटची कसोटी खेळला होता. मात्र 2017 पर्यंत टी-20 मध्ये टीम इंडियासाठी खेळलो. मात्र त्यानंतर त्याला या फॉरमॅटमध्येही संधी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT