Andre Russell IPL Record One Over ESAKAL
IPL

रसेलचा 'रशगुल्ला' परफॉर्मन्स; 'एक'ही मारा पण सॉलिड मारा!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 35 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) गुजारात टायटन्सला (Gujarat Titans) 156 धावात रोखले. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने (Andre Russell) गोलंदाजीत दमदार कामगिरी करत गुजरातच्या फलंदाजीला एकाच षटकात सुरूंग लावला. त्याने एका षटकात 5 धावा देत 4 विकेट घेतल्या. यामुळे गुजरातची अवस्था 5 बाद 151 धावांवरून 9 बाद 156 अशी केली.

विशेष म्हणजे आंद्रे रसेल हा आयपीएलमध्ये एक षटक किंवा त्यापेक्षा कमीचा स्पेल टाकत चार विकेट (IPL 4 Wickets In One Over) घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2008 ला केकेआरच्याच लक्ष्मी रतन शुक्लाने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 0.5 षटकात 6 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये श्रेयस गोपालने आरसीबी विरूद्धच्या सामन्यात एका षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. तसेच गुजरातला आजच्या सामन्यात शेवटच्या पाच षटकात फक्त 29 धावाच करता आल्या. यापूर्वी आयपीएलमध्ये एकादाच असे घडले होते. 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई विरूद्ध शेवटच्या पाच षटकात 22 धावा केल्या होता.

दरम्यान, गुजरातचे 156 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात देखील खराब झाली. मोहम्मद शामीने सुनिल नारायण आणि सॅम बिलिंग्जला बाद करत दोन धक्के दिले. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने नितीश राणाचा अडसर दूर केला. पाठोपाठ यश दयालने देखील कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत केकेआरची अवस्था 4 बाद 34 धावा अशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT