Andre Russell DC vs KKR ESAKAL
IPL

Andre Russell : रसेलने बॅट बदलली अन् केकेआरचा जीव पडला भांड्यात, दिल्लीसमोर उभारली सन्मानजनक धावसंख्या

अनिरुद्ध संकपाळ

Andre Russell DC vs KKR :आयपीएलच्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत त्यांना 127 धावात रोखले. केकेआरच्या आंद्रे रसेलने 38 धावांची खेळी केली. सुरूवातीला चाचपडत खेळणाऱ्या रसेलन बॅट बदलली अन् षटकारांचा पाऊस पडला. दिल्लीकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, नॉर्त्जे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दिल्लीकडून सलामीवीर जेसन रॉयने 39 चेंडूत 43 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या पार करून दिली. सुरूवातीला चाचपडत खेळणाऱ्या रसेलने मुकेश कुमारच्या शेवटच्या षटकात 3 षटकार ठोकले. रसेलने 30 धावा केल्यामुळे केकेआर 127 धावांपर्यंत पोहचू शकली.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत केकेआरला पॉवर प्लेमध्ये तीन धक्के दिले. मुकेश कुमारने लिटन दासला 4 तर नॉर्त्जेने व्यंकटेश अय्यरला शुन्यावर बाद केले. पाठोपाठ इशांत शर्माने देखील नितीश राणाला 4 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. दरम्यान, सलामीवीर जेनस रॉयने एकाकी झुंज देत संघाला 35 धावांपर्यंत पोहचवले.

पॉवर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावलेल्या केकेआरचा डाव रॉय आणि मनदीप सिंग सावरणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या अक्षर पटेलने मनदीप सिंगला 12 तर रिंकू सिंहला 6 धावांवर बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था 5 बाद 64 अशी झाली.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT