MS Dhoni RCB vs CSK IPL 2024 esakal
IPL

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni RCB vs CSK IPL 2024 : आरसीबी विरूद्ध चेन्नई हा चिन्नास्वामीवरील सामना महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा सामना ठरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट चाहते धोनी अजून एक हंगाम खेळावा अशी प्रार्थना करत आहे. धोनीने आरसीबीविरूद्ध 13 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याने शेवटच्या षटकात षटकार मारत सीएसकेची प्ले ऑफची आशा जिवंत ठेवली होती. मात्र पुढच्याच चेंडूवर यश दयालने त्याला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. तिथून पुढे चेन्नईला त्या षटकात फक्त एकच धाव करता आली.

दरम्यान, सामन्यानंतर एक निराशाजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यानंतर निराश झालेल्या धोनीने आरसीबी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले अन् ड्रेसिंग रूममध्ये गेला.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात महेंद्रसिंह धोनी पूर्णपणे फिट नव्हता. सामन्यानंतर धोनी चेन्नईच्या संघाच्या पुढे उभे राहून आऱसीबी खेळाडूंची वाट पाहत होता. आरसीबीचे खेळाडू सेलिब्रेशन करत होते. धोनी त्यांचं सेलिब्रेशन संपण्याची वाट पाहत होता. मात्र थोडी वाट पाहिल्यानंतर धोनीने ड्रेसिंग रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

धोनीने ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना आरसीबीच्या सपोर्ट स्टाफशी आणि राखीव खेळाडूंशी हस्तांदोलन केलं.

धोनीने आरसीबीच्या प्लेईंग 11 मधील खेळाडूंशी हस्तांदोलन केलं की नाही हे अजून समजू शकलेलं नाही. एका व्हिडिओनुसार विराट कोहली नंतर धोनीला भेटण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेल्याचं आढळू आलं.

यंदाच्या आयपीएल हंगामाची क्वालिफायर 2 आणि फायनल ही चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. हे सीएसकेचा होम ग्राऊंड आहे. चाहत्यांना वाटत होतं की धोनी आणि त्याचा संघ यंदा होम ग्राऊंडवर आयपीएलची ट्रॉफी उंचावले. मात्र आरसीबीने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवलं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT