KL-Rahul-Anil-Kumble 
IPL

IPL 2021: "आम्ही फलंदाजांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की.."

विराज भागवत

पंजाबच्या धक्कादायक पराभवानंतर अनिल कुंबळे खेळाडूंवर नाराज

IPL 2021: पंजाबच्या संघाने १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शतकी सलामी दिली होती. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल दोघांनीही दमदार फटकेबाजी करत संघाला १२ षटकांमध्ये १२० धावांपर्यंत मजल मारून दिली. त्या दोघांनंतर निकोलस पूरननेही २२ चेंडूत ३२ धावा केल्या. पण शेवटच्या १५ चेंडूत पंजाबच्या संघाला १० धावा करता आल्या नाहीत. पंजाबच्या या धक्कादायक पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी फलंदाजांबद्दल नाराजी व्यक्त केली.

"आमच्या संघासाठी अशा प्रकारचे धक्कादायक पराभव हे आता नित्याचे झाले आहेत. ही बाब चांगली नाही, पण आम्ही दुबईत आलो की असं काहीतरी घडतं. आम्ही आमच्या फलंदाजांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की १९ षटकांत सामना जिंका. त्यादृष्टीनेच आमचे फलंदाज खेळत होते. पण आमचं नशीब वाईट असल्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला. आणि मग आमचे फलंदाज चुकीच्या वेळी बाद होत गेले आणि नवा फलंदाज खेळायला येत राहिला. त्या गोंधळात आमचा संघ पराभूत झाला", असं कुंबळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८५ धावा केल्या. सलामीवीर एव्हिन लुईस (३६) आणि यशस्वी जैस्वाल (४९) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लॉमरॉरने तुफान फटकेबाजी करत १७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर राहुल (४९) आणि मयंक अग्रवाल (६७) यांनी १२० धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने (३२) फटकेबाजी केली. एडन मार्क्रमही दमदार फलंदाजी करत होता, पण शेवटच्या दोन षटकात त्याला फारशी फलंदाजी मिळाली नाही. परिणामी शेवटच्या षटकात ४ धावांची गरज असूनही पंजाबला त्या धावा जमवता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT