anil kumble punjab kings coach Team not playoff angry fans
anil kumble punjab kings coach Team not playoff angry fans  
IPL

'कुंबळेला हाकला, संघ वाचवा', पंजाबच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले

Kiran Mahanavar

PBKS IPL 2022 : आयपीएलमध्ये पंजाब किंग्स काही आता प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही. गेल्या काही हंगामापासून सातत्याने ते होत आहे. हंगामाच्या सुरवातीला पंजाब किंग्सचा संघ चांगली खेळी करतो. पण शेवट शेवट संघाच समतोल बिघडत. या हंगामात पंजाबकडे चांगले खेळाडू होते, आणि नवा कर्णधार पण होता. तरीही संघाला प्लेऑफमध्ये जात आलं नाही. त्यामळे चाहते आता संतापले दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते संतापले असून सर्वांनी पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना संघाच्या खराब कामगिरीचा दोषी ठरवत आहे.(Anil Kumble Punjab Kings Team Not Playoff Angry Fans)

अनिल कुंबळे कित्येक वर्षतरी पंजाब किंग्जच्या संघा सोबत आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात कोणता खेळाडू द्यायचा कोणाला प्लेइंग-11 खेळवायचं यावर कुंबळे सतत सक्रिय असतात. तरीही संघाला आजून एकही विजेतेपद मिळवून दिल नाही. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, आयसीसी किंवा आयपीएल ट्रॉफी न जिंकल्याबद्दल विराट कोहलीला दोष दिला जातो, पण दरवर्षी पंजाब किंग्ज प्लेऑफमध्येही पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत अनिल कुंबळेला का काही बोलत नाही. काही युजर्सनी पंजाब किंग्सच्या ट्विटच्या खाली लिहिले की कुंबळेला हटवा, टीम वाचवा.

पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत हंगामात 13 सामन्यांत केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यात त्याना पराभव सामना करायला लागला आहे. संघाने शेवटचा सामना जिंकला तरी आता तो प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. संघाचा नवा कर्णधार मयंक अग्रवाल पण यंदा फलंदाजी करण्यात अपयशी ठरला, मयंकला सलामीवरून कडून मधल्या फळीत खेळायला आणलं लागले. पण तिथेही त्याला धावा करता आल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT