MI vs PBKS Arjun Tendulkar esakal
IPL

MI vs PBKS : एक विकेट घेणारा अर्जुन पडला महागात; पंजाबने मुंबईसमोर ठेवले मोठे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

MI vs PBKS Arjun Tendulkar : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 31 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर टक्कर देत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने पंजाबला ठराविक अंतराने धक्के दिले. कॅमरून ग्रीनने मॅथ्यू शॉर्टला 11 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. यानंतर प्रभसिमरन सिंग आणि अथर्व तायडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली.

मात्र ही भागीदारी अर्जुन तेंडुलकरने तोडली. त्याच्या सुरेख यॉर्करवर प्रभसिमन सिंग 26 धावा करून पायचीत बाद झाला. त्यानंतर पियुष चावलाने पंजाबच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवले. त्याने 29 धावांवर अथर्व तायडेला आणि 10 धावांवर लिम लिव्हिंगस्टोनला बाद केले. मात्र यानंतर पंजाबने आपला डाव सावरण्यास सुरूवात केली.

हरप्रीत सिंग भाटिया आणि सॅम करन यांनी आक्रमक भागीदारी रचली. हरप्रीत सिंगने अर्जुन तेंडुलकर टाकत असलेल्या 16 व्या षटकात तब्बल 31 धावा ठोकल्या. अर्जुनने या षटकात 2 सिक्स आणि चार चौकार दिले. यामुळे त्याची बॉलिंग फिगरच बिघडली. अर्जुन तेंडुलकरने आज 3 षटकात 48 धावा देत एक बळी टिपला.

अखेर ग्रीनने हरप्रीत सिंग भाटियाला 41 धावांवर बाद करत ही 91 धावांची भागीदारी तोडली. मात्र त्यानंतर आलेल्या जितेश शर्माने दोन चेंडूत दोन षटकार ठोकत पंजाबला 188 धावांपर्यंत पोहचवले. जोफ्रा आर्चर टाकत असलेल्या 19 व्या षटकात करनने दोन चौकारांसह 10 धावा करत पंजाबला 197 धावांपर्यंत पोहचवले. अखेर सॅम करन 29 चेंडूत 55 धावा करून बाद झाला.

अखेरच्या षटकात जितेश शर्माने बेहरनडॉर्फला दोन षटकार मारत पंजाबला 200 पार पोहचवले. मात्र बेहरनडॉर्फने 7 चेंडूत 25 धावा चोपणाऱ्या शर्माचा त्रिफळा उडवला. शेवटच्या दोन चेंडूवर बेहरनडॉर्फने 5 धावा दिल्या. त्यामुळे पंजाबने 20 षटकात 8 बाद 214 धावा केल्या.

अर्जुन सोबतच मुंबईच्या बेहरनडॉर्फ, जोफ्रा आर्चर आणि कॅमरून ग्रीन या गोलंदाजांचीही धावा देण्याची सरासरी प्रती षटक 10 धावांच्या वर राहिली. फक्त पियुष चावलाने 5 च्या सरासरीने धावा देत 2 बळी टिपले. ग्रीननेही 2 बळी टिपले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT